मुंबई : शहर उपनगरात बुधवारी ६ हजार ३२ रुग्णांचे निदान झाले, तर १२ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत दिवसभरात १८ हजार २४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९ लाख ६६ हजार ९८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ६६ दिवसांवर आला असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ३१ हजार ८५६ झाली आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के आहे. १२ ते १८ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर १.०३ टक्के आहे. दिवसभरातील ६ हजार रुग्णांपैकी ५ हजार ६७ रुग्ण लक्षणविरहित आहेत, हे प्रमाण ८४ टक्के आहे. मुंबईत एकूण १० लाख १७ हजार ९९९ कोरोनाबाधित असून, मृतांचा आकडा १६ हजार ४८८ आहे. पालिकेने रुग्णांचा शोध घेण्यासाठी २४ तासांत ६० हजार २९१ चाचण्या केल्या असून, एकूण १ कोटी ४७ लाख ७९ हजार ९५ कोरोना चाचण्या केल्या आहेत.
CoronaVirus News: मुंबईत वाढले कोरोनामुक्त; दिवसभरात १८,२४१ रुग्ण घरी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 8:03 AM