CoronaVirus: मुंबई सावरली! आज दिवसभरात केवळ ७८५ नवे रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 08:59 PM2020-07-07T20:59:09+5:302020-07-07T22:17:37+5:30
महाराष्ट्रात एकूण 217121 रुग्ण झाले आहेत. आज 5134 नववे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्राच्या आकड्यातही घट झाली आहे. तसेच 3296 रुग्णांना बरे झाल्याने सोडण्यात आले आहे.
मुंबई – मागील ३-४ महिन्यांत गतीने वाढणारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. देशात मुंबई ही कोरोनाच्या उद्रेकाचे महत्त्वाचे केंद्रस्थान झाली होती मात्र आता हळूहळू हे चित्र पालटताना दिसत आहे. कोरोनाच्या विळख्यातून मुंबई सावरत असून मंगळवारी दैनंदिन रुग्ण निदानात मोठी घट झाली आहे. दिवसभरात केवळ ७८५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६४ मृत्यू झाले आहेत.
शहर उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या ८६ हजार ५०९ झाली आहे. तर मृत्यू ५ हजार २ झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील ५८ हजार १३७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या २३ हजार ३५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, आता शहर उपनगरातील रुग्ण दुपटीचा दर ४४ दिवसांवर गेला आहे.
मुंबईत मंगळवारी ६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात ५४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४४ रुग्ण पुरुष व २० रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी पाच रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. ४० जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. तर उर्वरित १९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ६७ टक्क्यांवर आला आहे. २९ जून ते ६ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.५८ टक्क्यांवर आला आहे. सोमवारपर्यंत शहर उपनगरात ३ लाख ६३ हजार १२० कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत.
सुविधा केंद्र खाटांची क्षमता
मुलूंड (सिडको सौजन्याने) १६५०
दहीसर पूर्व/पश्चिम (मुंबई मेट्रो सौजन्याने) ९५५/१०८ अतिदक्षता खाटा
महालक्ष्मी रेसकोर्स(नमन समूह सौजन्याने) ६००
एमएमआरडीए (सेंकड फेझ) ११२ अतिदक्षता खाटा
धारावीत केवळ एकाच रुग्णाचे निदान
धारावीत मंगळवारी केवळ एकाच रुग्णाचे निदान झाले आहे. धारावीत सध्या २ हजार ३३५ कोरोना रुग्ण असून ३५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १ हजार ७३५ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. मागील तीन महिन्यांत पहिल्यांदाच धारावीच्या झोपडपट्टीच्या वस्तीत एका रुग्णाचे निदान झाले आहे. धारावी झोपडपट्टीतील कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्याचे कठोर आव्हान प्रशासनासमोर होते. मात्र कमी वेळात चाचणी, शोध व उपचार या त्रिसूत्रींच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले. धारावी झोपडपट्टीत आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाने कोरोना नियंत्रणावर केलेल्या कामगिरीबद्दल केंद्र शासनानेही प्रशासनाला कौतुकाची पावती दिली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील
मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर
CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला
चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान मागे आले!
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन भारतात कधी येणार? लाँचिंगची तारीख Amazon नेच केली लीक
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत