Join us

CoronaVirus News: धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर; दिवसभरात फक्त चार रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 2:11 AM

धारावीत दिवसभरात ४ रुग्ण आढळून आलेत.

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच मुंबई शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एकेकाळी मुंबईत वरळी आणि धारावी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता मुंबईत कोरोना नियंत्रणात येताना दिसत असतानाच धारावीतही कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. धारावीत दिवसभरात ४ रुग्ण आढळून आलेत.धारावीत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ६७२ इतकी आहे. तर केवळ ८० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादरमध्ये २९ रुग्ण तर माहीममध्ये १९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जी उत्तरमध्ये ५२ रुग्णांची भर पडली आहे. दादरमध्ये आज २९ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही २ हजार २३७ इतकी झाली आहे, ४६५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.माहीममध्ये सोमवारी १९ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २ हजार १२ इतकी झाली. तर २५६ सक्रिय रुग्ण आहेत. संपूर्ण जी उत्तरमध्ये एकूण ८०१ सक्रिय रुग्ण आहेत. जी उत्तर विभागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ५२ रुग्णांची भर पडली आहे़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या