CoronaVirus News: कोविडमुक्त रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग; विशेष तज्ज्ञांचा चमू करणार उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 01:47 AM2020-08-09T01:47:02+5:302020-08-09T01:47:22+5:30

मुलुंडमध्ये पोस्ट कोविड-१९ ओपीडी

CoronaVirus News: Outpatient department for covid-free patients | CoronaVirus News: कोविडमुक्त रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग; विशेष तज्ज्ञांचा चमू करणार उपचार

CoronaVirus News: कोविडमुक्त रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग; विशेष तज्ज्ञांचा चमू करणार उपचार

Next

मुंबई : कोरोनाच्या संसर्गावर मात केलेल्या रुग्णांवर दिसून येणारे कोविड-१९चे तत्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम दूर करण्यासाठी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलने ‘पोस्ट कोविड-१९ ओपीडी’ अर्थात, केवळ कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी समर्पित विशेष बाह्यरुग्ण विभागाची सिद्धता केली आहे.

पोस्ट कोविड-१९ ओपीडीचे काम क्लिनिकल असेसमेंट म्हणजे चिकित्सात्मक तपासणी, सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शन किंवा मानसशास्त्रीय सल्लामसलत आणि रिहॅबिलिटेटिव्ह केअर म्हणजे पुनर्वसनात्मक देखभाल या तीन स्तंभावर आधारलेले असेल.

या आजारामुळे रुग्णांच्या हालचाली, शारीरिक व्यायामांचा ताण सहन करण्याची शक्ती आणि स्नायूंचा कमकुवतपणा या गोष्टींवर किती परिणाम झाला आहे याचे मूल्यमापन करण्यासाठी शारीरिक पुनर्वसनही महत्त्वाचे आहे. कोविड-१९च्या तीव्र लक्षणांशी झगडलेल्या रुग्णांमध्ये दिसून येणाºया पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (ढळऊर)च्या समस्येवर उपचार करण्यामध्ये शारीरिक तपासणी मोठी भूमिका बजावू शकेल; शारीरिक पुनर्वसनाइतकेच या घटकाकडे लक्ष देणेही अगत्याचे आहे. या ठळक बाबींकडे लक्ष पुरविल्याने कोविड-१९ आजारातून बरे होताना शरीरावर होणारे परिणाम समजून घेण्यास, त्यांचे निदान करण्यास व त्यावरील उपचारांमध्ये मदत होईल.

क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात येत असलेले हे पोस्ट कोविड-१९ ओपीडीमध्ये संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू आणि डॉ. कीर्ती सबनीस व इंटेन्सिव्ह केअर विभागाचे सल्लागार डॉ. चारुदत्त वैती यांच्यासह मानसिक आरोग्यतज्ज्ञ व फिजिओथेरपिस्ट असे पहिल्या फळीतील डॉक्टर्स कार्यरत असतील.

कोविडमधून बचावलेल्या रुग्णांचे डिस्चार्जनंतर १४व्या आणि २८व्या दिवशी आणि त्यानंतर तिसºया आणि सहाव्या महिन्यामध्ये मूल्यमापन करेल. अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असलेला हा बाह्यरुग्ण विभाग हॉस्पिटलमध्ये दर आठवड्याला बुधवारी आणि शनिवारी सुरू राहील.

कोविड-१९ ओपीडीबद्दल बोलताना फोर्टिस रुग्णालय, मुलुंडच्या क्रिटिकल केअर विभागाचे संचालक आणि राज्याच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले, कोविड-१९शी झुंज दिलेल्या रुग्णांमध्ये व्यायामाचा ताण सहन न होणे, झोपेचे वेळापत्रक बिघडणे, स्नायूंची हानी, भूक न लागणे असे काही लक्षणीय बदल झाल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक रुग्ण आजारातून बरे होण्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे यानुसार त्याच्या पुनर्वसनाची योजना आखावी लागेल व ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये रुग्णामध्ये दिसून येणा-या बदलांचे निरीक्षण करावे लागेल.

गुंतागुंतीचे होणार मूल्यमापन
पोस्ट कोविड-१९ ओपीडीमध्ये रुग्णांच्या, विशेषत: आजाराने गुंतागुंतीचे स्वरूप घेतल्याने अतिदक्षता विभागामध्ये दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांच्या फुप्फुसांच्या आरोग्याचे आणि पल्मोनरी फायब्रोसिस यांचेही मूल्यमापन केले जाईल. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यांसारख्या तक्रारी आधीपासूनच असलेल्या रुग्णांमध्ये या आजारांची तीव्रता पूर्वी किती होती व कोविड-१९ची लागण झाल्यानंतर ती किती प्रमाणात बदलली आहे हे जाणून घेण्यासाठी मूल्यमापन केले जाईल. अशा प्रकारे कळीच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून केलेल्या उपाययोजनांमुळे कोविड-१९मधून बचावलेल्या ज्या रुग्णांना सरसरकट अशक्तपणा आणि निष्क्रियता जाणवते आहे, अवयवांमध्ये वेदना जाणवत आहेत व ज्यांच्या फुप्फुसांचे कार्य संपूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू होण्यास अडचण येत आहे, अशा रुग्णांना मदत होऊ शकेल़

Web Title: CoronaVirus News: Outpatient department for covid-free patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.