Join us

CoronaVirus News: दिलासादायक! कोरोनावर मात करत मुंबईतील हजार पोलीस पुन्हा सेवेत रुजू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 5:05 AM

उपचाराअंती १,९१९ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून यातील १ हजार १३ पोलीस पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबई पोलीस दलातील ३७ पोलिसांना जीव गमवावा लागला, तर कोरोनावर मात करत एक हजार तेरा पोलीस पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले आहेत. विविध जबाबदारीबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बंदोबस्तावर असलेल्या मुंबईतील २,६०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी उपचाराअंती १,९१९ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून यातील १ हजार १३ पोलीस पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत.डोक्यावर छत्र राहणारकोरोना विरुद्धच्या लढ्यात जीव गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना ६५ लाखांच्या आर्थिक मदतीबरोबरच, संबंधित पोलिसाच्या निवृत्तीच्या वयापर्यंत कुटुंबीयांना त्याच घरात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे अनेकदा घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनांनंतर निवारा गमवाव्या लागणाºया पोलीस कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.हल्ले सुरूचकायदा, सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी तैनात पोलिसांवर हल्ले करण्यात येत आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यात पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी २८३ गुन्हे नोंद झाले असून, ८५८ जणांना अटक करण्यात आली.>२४ तासांत १६ पोलिसांना लागणराज्यात गेल्या २४ तासांत १६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. १,००७ पोलीस कोरोनावर उपचार घेत असून ३ हजारांहून अधिक पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.>राज्य राखीव पोलीस दलातील९३ जवानांना कोरोनामुंबईत तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) ९३ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यात ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या