मुंबई : मुंबईत तब्बल २ लाख ३४ हजार ५५१ रुग्णांनी कोरोनाला य़शस्वीरित्या हरविले आहे. त्यामुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर गेला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १९९ दिवसांवर पोहोचला आहे.सध्या मुंबईत १६ हजार ११६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.मुंबईत बुधवारपर्यंत कोरोनाच्या १५ लाख ८१ हजार ४८७ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ८४१ नवीन रुग्ण आढळले असून २५ मृतांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित २ लाख ६१ हजार ६८९ झाले आहेत, तर मृतांचा आकडा १० हजार ३७७ झाला आहे. दादरमध्ये बुधवारी १२ तर गुरुवारी केवळ तीन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत गुरुवारी पुन्हा एका रुग्णाची नोंद झाली असून सध्या ७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
CoronaVirus News : मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १९९ दिवसांवर; दिवसभरात ८४१ बाधितांचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 05:43 IST