CoronaVirus News: देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी; राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८%

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 01:13 AM2020-07-24T01:13:26+5:302020-07-24T06:22:21+5:30

राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८% कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर

CoronaVirus News: The patient recovery rate in the state is lower than in the country | CoronaVirus News: देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी; राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८%

CoronaVirus News: देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी; राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८%

Next

मुंबई : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८ टक्के आहे. देशात ७ लाख ८२ हजार रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत, तर राज्यात एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गुरुवारी दिवसभरात ६ हजार ४८४ रुग्ण बरे झाल. राज्यात कोविडमुक्त होत असलेल्या रुग्णांची संख्या आता दोन लाखांच्या उंबरठ्यावर आहे.

राज्यात सध्या १ लाख ४० हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात ९ हजार ८९५ रुग्ण व २९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ४७ हजार ५०२ झाली आहे, तर बळींचा आकडा १२ हजार ८५४ झाला आहे. राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्के आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या २९८ मृत्यूंमध्ये मुंबई ५५, ठाणे ७, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ७, कल्याण-डोंबिवली मनपा १८, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी-निजामपूर मनपा ४, मीरा-भार्इंदर मनपा २, पालघर २, वसई-विरार मनपा २३, रायगड ३, नाशिक ५, नाशिक मनपा ८, मालेगाव मनपा २, अहमदनगर १, धुळे मनपा २, जळगाव ८, जळगाव मनपा ५, पुणे १९, पुणे मनपा ३७, पिंपरी-चिंचवड मनपा २२, सोलापूर १, सोलापूर मनपा २, सातारा १, कोल्हापूर ३, कोल्हापूर मनपा १, सांगली २, सांगली-मिरज कुपवाड ३, रत्नागिरी २, औरंगाबाद १०, जालना ३, हिंगोली ४, परभणी मनपा १, लातूर ५, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, बीड ३, अकोला १, अमरावती मनपा २, यवतमाळ २, नागपूर मनपा १ आणि अन्य राज्य/ देशातील ६ रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत आणखी ५५ बळी

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार २४५ रुग्ण तर ५५ मृत्यू झाले आहेत. शहर-उपनगरात १ लाख ५ हजार ९२३ कोरोनाबाधित असून मृतांची संख्या ५ हजार ९३० वर पोहोचली आहे, तर अन्य कारणांमुळे आतापर्यंत २९३ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. च्सध्या २२ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: CoronaVirus News: The patient recovery rate in the state is lower than in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.