CoronaVirus News: मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८३ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 03:13 AM2020-10-06T03:13:11+5:302020-10-06T03:13:24+5:30
मुंबईत सोमवारी रुग्ण बरे होण्याचा दर ८३ टक्क्यांवर पोहोचलेला दिसून आला तर आतापर्यंत १ लाख ७९ हजार ५१९ रुग्ण कोविडमुक्त झाले.
मुंबई : कोरोनाच्या वाढणाऱ्या प्रादुर्भावानंतर आता मात्र मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पालिकेच्या आरोग्य ?ोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी रुग्ण बरे होण्याचा दर ८३ टक्क्यांवर पोहोचलेला दिसून आला तर आतापर्यंत १ लाख ७९ हजार ५१९ रुग्ण कोविडमुक्त झाले.
रुग्ण दुपटीचा काळ ६५ दिवसांवर आला आहे. २८ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर दरम्यान एकूण कोविड वाढीचा दर १.०७ टक्के असल्याची नोंद झाली. मुंबईत दिवसभरात ३ हजार ५०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सोमवारी १ हजार ८१३ रुग्ण आणि ४७ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा २ लाख १५ हजार ४६५ वर पोहोचला असून बळींची संख्या ९,१५२ आहे. सध्या २४ हजार १९९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.