CoronaVirus News : कोकिलाबेन रुग्णालयात ३० बालकांना नवसंजीवनी, अकरा जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 01:51 AM2020-06-25T01:51:14+5:302020-06-25T01:52:10+5:30

केवळ मुंबईतील नव्हे तर राज्याच्या अकरा जिल्ह्यातील बालकांना कोकिलाबेन रुग्णालयातील तज्ज्ञांनी नव्याने जन्म दिला आहे.

CoronaVirus News : Resuscitation of 30 children at Kokilaben Hospital, relief to patients from 11 districts | CoronaVirus News : कोकिलाबेन रुग्णालयात ३० बालकांना नवसंजीवनी, अकरा जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा

CoronaVirus News : कोकिलाबेन रुग्णालयात ३० बालकांना नवसंजीवनी, अकरा जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा

Next

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात ३० लहानग्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. केवळ मुंबईतील नव्हे तर राज्याच्या अकरा जिल्ह्यातील बालकांना कोकिलाबेन रुग्णालयातील तज्ज्ञांनी नव्याने जन्म दिला आहे.
धारावीतील सात दिवसांच्या ते सहा वर्षांच्या लहानग्यांना रुग्णालयातील ‘हिलिंग लिटल हार्ट्स’ या उपक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, राज्यातील हिंगोली, कोल्हापूर, नांदेड, सांगली, जळगाव, उस्मानाबाद, पुणे, ठाणे आणि मुंबई येथील लहानग्यांचा समावेश आहे. धारावी येथील सात दिवसांच्या बाळाला हृदयाच्या नसांमध्ये गुंतागुंत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्यानंतर कोरोना चाचणी करून या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर नाशिक येथील ३ महिन्यांच्या बाळाला सामाजिक संस्थेच्या मदतीने मुंबईत आणण्यात आले. या चिमुरडीवर रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले.
सांगली येथील १ वर्ष चार महिन्यांच्या बाळाला मे महिन्यात रुग्णालयात आणण्यात आले. या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. या बाळाला सतत ताप येत होता, तसेच उलट्याही होत होत्या. कित्येक दिवस बाळाच्या वजनात वाढ नव्हती, या बाळावर कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य वेळेस उपचार केल्याने बाळाच्या प्रकृती स्थिर झाली, आता हे बाळ सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याविषयी, रुग्णालयाचे बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी सांगितले. बऱ्याचदा हृदयरोगाच्या तक्रारी असल्याने पालक घाबरत होते. मात्र अशा रुग्णांमध्ये लवकर निदान झाल्यामुळे यशस्वी शस्त्रक्रिया व औषधोपचार मिळाल्याने या रुग्णांची प्रकृती सुधारण्यास मदत झाली. तर चिल्ड्रन हार्ट सेंटरचे संचालक डॉ. सुरेश राव यांनी सांगितले लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सेवा मिळणे कठीण होते अशी स्थिती असताना कोविडमुळे कोणतेही रुग्णालय रुग्णांना दाखल करून घेण्यास मनाई करत होते.
> बालके आजाराने त्रस्त
सांगली येथील १ वर्ष चार महिन्यांच्या बाळाला मे महिन्यात रुग्णालयात आणण्यात आले. या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. या बाळाला सतत ताप येत होता, तसेच उलट्याही होत होत्या.

Web Title: CoronaVirus News : Resuscitation of 30 children at Kokilaben Hospital, relief to patients from 11 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.