CoronaVirus News: हॉटेल, रिसॉर्टसाठी नियमावली जाहीर; ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 01:46 AM2020-09-12T01:46:35+5:302020-09-12T07:00:09+5:30

राज्य सरकरने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्ट इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास संमती दिली.

CoronaVirus News: Rules for hotels and resorts announced | CoronaVirus News: हॉटेल, रिसॉर्टसाठी नियमावली जाहीर; ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारचा निर्णय

CoronaVirus News: हॉटेल, रिसॉर्टसाठी नियमावली जाहीर; ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारचा निर्णय

googlenewsNext

मुंबई : राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील निवास व्यवस्था असलेली हॉटेल्स आणि रिसॉर्ट, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फॉर्म स्टे सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयाने नियमावली जाहीर केली. ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत हा निर्णय सरकारने घेतला.

राज्य सरकरने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्ट इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास संमती दिली, पण हे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. त्यानुसार, हॉटेल्स, रिसॉर्ट्सनी सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गनमार्फत तपासणी करावी. लक्षणे नसलेल्याच पर्यटक, प्रवाशांना प्रवेश द्यावा.

वेटिंग रूम आदी सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी प्रवाशाची माहिती प्रशासन, आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत प्रवाशाची ना हरकत घ्यावी. मास्कचा वापर, सर्व आवश्यक ठिकाणी हँड सॅनिटायजर ठेवावेत. पैशांची हाताळणी करताना काळजी घ्यावी. डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे सांगण्यात आले आहे.

  • हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाºया वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करावी.
  • पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्यतो ऑनलाइन भरून घ्यावा.
  • शक्य असल्यास क्युआर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-इनसारख्या बाबी सुरू कराव्यात.
  • काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील माहिती पर्यटकांना बुकलेट किंवा व्हिडीओच्या स्वरूपात द्यावी.
  • पर्यटकांनी त्यांच्या सामानाची स्वत: ने-आण करावी.
  • एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास समोरासमोर संपर्क टाळण्याच्या दृष्टीने वर जाणे आणि खाली येण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करावा.
  • रुम सर्व्हिस संपर्कविरहित असावी. मागवलेली ऑर्डर रूमबाहेर ठेवावी.
  • लहान मुलांसाठीचे प्ले एरिया बंद ठेवावे.

Web Title: CoronaVirus News: Rules for hotels and resorts announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.