CoronaVirus News : सलूनही आता होमसर्व्हिसच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:57 AM2020-06-23T00:57:51+5:302020-06-23T00:58:37+5:30

CoronaVirus News : याची सुरुवात करण्यात आली असून ग्राहकांच्या विश्वासावर हा व्यवसाय आता पूर्णपणे अवलंबून असणार आहे.

CoronaVirus News : The saloon is also now on the way to home service | CoronaVirus News : सलूनही आता होमसर्व्हिसच्या मार्गावर

CoronaVirus News : सलूनही आता होमसर्व्हिसच्या मार्गावर

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : कोरोना संकटामुळे डबघाईला आलेल्या ब्युटीइंडस्ट्रीमुळे सलून आणि ब्युटीपार्लरना आता उदरनिर्वाहासाठी ‘होम सर्व्हिस’चा मार्ग निवडावा लागणार आहे. याची सुरुवात करण्यात आली असून ग्राहकांच्या विश्वासावर हा व्यवसाय आता पूर्णपणे अवलंबून असणार आहे.
लॉकडाऊनला तीन महिने पूर्ण होत आहेत. सलून तसेच ब्युटीपार्लरचे शटर डाऊन असून अजूनही त्याबाबत सरकारकडून ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सलूनकडून आता ‘होम सर्व्हिस’चा पर्याय निवडण्याचा विचार सुरू असून काहींनी तर सुरुवातही केली आहे. फायदा कमविणे दूर राहिले, पण निदान संबंधित सलूनवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार सुरू करण्यासाठी आणि गाळ्यांचे भाडे व मेंटेनन्स भरण्यासाठी हे करावेच लागणार असल्याचे या चालक तसेच मालकांकडून सांगितले जात आहे. ज्यात ९० टक्के लोकांचा समावेश आहे.
>भाड्यासाठी तगादा
माझे सलून मी सुरू करून एक वर्षही झाले नाही. माझ्याकडे जवळपास १५ जण काम करतात आणि सर्वच गरीब कुटुंबातील आहेत. मी जे दुकान भाडेतत्त्वावर घेतले ते मार्चपासून बंद आहे. मात्र त्याच्या मालकाकडून सतत भाडे आणि वीजबिलासाठी तगादा लावण्यात येत आहे. परिणाम हे पैसे आणि माझ्या कर्मचाºयांचे पगार देण्यासाठी तरी मला ‘होम सर्व्हिस’चा मार्ग अवलंबणे भाग आहे.
>विश्वास परत मिळवण्यास लागतील वर्षे
सलून उघडण्यास सरकारने ग्रीन सिग्नल दाखवला तरी ग्राहकाचा विश्वास परत मिळवण्यास अनेक महिने किंवा वर्षे लागतील. मध्यंतरी सलूनमध्ये गेल्याने कोरोनाची बाधा झाल्याच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होत्या. त्यामुळे ग्राहकांमधील भीती वाढली आहे. अनेक ग्राहकांना स्वत:च्या घरात सुरक्षित वाटते, त्यामुळे ते घरी बोलावून हॅण्डसॅनिटाइझ करून तसेच अन्य काळजी घेऊन सर्व्हिस करून घेतात.
>खोटी ओळख सांगून मिळतो प्रवेश!
प्रोफेशनल सलूनमध्ये वर्षानुवर्षे येणारे आमचे ग्राहक त्यांच्या घरी विश्वासाने आम्हाला बोलावतात. मात्र सोसायटी गेटवर कॉम्प्युटर इंजिनीअर, इलेक्ट्रिशियन आणि वेळीच डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत आम्हाला प्रवेश मिळवावा लागतो. कारण ब्युटिशियन सांगितल्यावर गेटवरूनच परत पाठविल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
>सरकारचाच अविश्वास?
‘सलून आणि ब्युटीपार्लर सुरू करण्यासाठी सरकारकडे वारंवार विनंती करूनही काही उपयोग झाला नाही. ‘होम सर्व्हिस’शिवाय पर्याय नाही. कारण १५ ते २५ लाख लोकांच्या रोजगाराचा हा सवाल आहे. कारण ही सर्व्हिस इंडस्ट्री असल्याने मनुष्यबळावर अवलंबून आहे.

Web Title: CoronaVirus News : The saloon is also now on the way to home service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.