CoronaVirus News: कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात परिचारिका संपाच्या पवित्र्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:59 AM2020-08-18T04:59:10+5:302020-08-18T04:59:27+5:30

मात्र आता प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील परिचारिकांनी संपावर जाण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

CoronaVirus News: sanctity of the nurse strike in the crisis of corona outbreaks | CoronaVirus News: कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात परिचारिका संपाच्या पवित्र्यात

CoronaVirus News: कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात परिचारिका संपाच्या पवित्र्यात

Next

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, या काळातही परिचारिका जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहेत. मात्र आता प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील परिचारिकांनी संपावर जाण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून आंदोलन करण्यात येईल. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे. राज्यात गेल्या अनेक वर्षांत परिचारिकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. शंभर टक्के पदभरतीसाठी शासनाने परवानगीही दिली आहे, मात्र प्रत्यक्षात पदभरती झालेली नाही. पदभरती करावी, केंद्र सरकारप्रमाणे जोखीम भत्ता नव्याने मंजूर करावा आदी त्यांच्या मागण्या आहेत.
...तर बेमुदत संप
१ सप्टेंबरपासून रुग्णसेवा विस्कळीत न करता काळी फीत आंदोलन करणार आहोत. मात्र तरीही मागण्या मान्य न झाल्यास ८ सप्टेंबर रोजी एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus News: sanctity of the nurse strike in the crisis of corona outbreaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.