CoronaVirus News: एका रुग्णामागे 15 हून अधिक सहवासितांचा शोध; बाधितांच्या संख्यावाढीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:00 AM2021-02-25T01:00:08+5:302021-02-25T06:43:55+5:30

मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे गरजेचे

CoronaVirus News: Search for more than 15 companions per patient; Risk of increase in the number of victims | CoronaVirus News: एका रुग्णामागे 15 हून अधिक सहवासितांचा शोध; बाधितांच्या संख्यावाढीचा धोका

CoronaVirus News: एका रुग्णामागे 15 हून अधिक सहवासितांचा शोध; बाधितांच्या संख्यावाढीचा धोका

Next

मुंबई : मुंबईत वाढलेल्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनासह राज्य शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सहवासितांच्या शोधावर मुंबई महानगरपालिका अधिक भर देत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

शहर उपनगरात एका रुग्णामागे जवळपास १५ ते २० संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येतो अशी माहिती पालिकेने दिली आहे.रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे कमी केल्यामुळे रुग्णवाढीचा धोका संभवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सहवासितांचा शोध आणि निदान यावर अधिकाधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

तापमानातील बदल, रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांचा शोध घेण्यातील शिथिलता, मास्क वापरण्यास टाळाटाळ, सार्वजनिक समारंभातील गर्दी,  अनलाॅकचा पुढचा टप्पा आणि कोरोनाविषयी गांभीर्याबद्दल अनभिज्ञता अशा विविध कारणांमुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासह इतरांच्या सुदृढ, निरोगी आरोग्याचा विचार करून मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे. संवेदनशील गटातील व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी, अशी माहिती श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. कीर्ती सोनावणे यांनी दिली आहे.

याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, गेल्या काही दिवसात सतत होत असलेली कोरोना रुग्णांची वाढ प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला चाचण्यांच्या क्षमतेत वाढ कऱणे, रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेणे, चाचणी – निदान व उपचार प्रक्रियेत आणणे यावर भर देण्यात येत आहे.

शिवाय, विलगीकरणाचे नियमही सक्तीचे करण्यात आले आहेत. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सुरु आहे. शिवाय, कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: CoronaVirus News: Search for more than 15 companions per patient; Risk of increase in the number of victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.