मुंबई भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील मुंबई शहरातील केईएम हॉस्पिटलचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, ज्या वॉर्डमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तेथे मृतदेह देखील पडून आहेत. अशा व्हायरल व्हिडीओबाबत केईएम रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या प्रकरणी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई या प्रकरणात म्हणाले, जास्तीत जास्त काळजी घेतली जात आहे. असा एखादा व्हिडिओ (केईएम हॉस्पिटल) सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्यास कदाचित त्याच क्षणी तो प्रकार घडला असावा, पण लगेच त्यात सुधारणा करण्यात आली असून, उपाययोजना केली गेली आहे. सर्व अधिकारी कार्यक्षमतेने काम करीत आहेत. कोणालाही बदनाम करण्याची गरज नसल्याचंही अनिल देसाई यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Lockdown : पोस्टाच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; दर महिन्याला होणार जबरदस्त कमाई
CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली
Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"
"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"
Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!