CoronaVirus News : राज्यभरातून एसटी बस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये होणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:51 AM2020-05-18T04:51:36+5:302020-05-18T06:44:29+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरू आहे.
मुंबई : लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळातर्फे मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून बस चालविण्यात येत आहेत. मात्र ही सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे आता राज्यभरातून सुमारे ९७५ )बस आणि १,२५० चालकांना मुंबई, पालघर, ठाणे येथे दाखल होण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरू आहे. दररोज ७०० फेरी करुन १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचाºयांची ने-आण करण्यात येत आहे. त्यासाठी दररोज ४०० एसटीचे कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. तसेच परदेशातून व देशातील विविध राज्यातून विमान व रेल्वेद्वारे येत असलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून द्याव्या लागत आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी विभागातून ५० ते १०० चालक, बस मुंबई, पालघर, ठाणे येथे दाखल करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला दिल्या आहेत.
धुळे विभागातून १५० एसटी बससह चालक; नाशिक, सांगली, सोलापूर, अहमदनगर या प्रत्येक विभागातून प्रत्येकी १०० एसटी बससह चालक; सातारा या विभागातून ७५ एसटी बससह चालक; बीड, रत्नागिरी, रायगड औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना या प्रत्येक विभागातून प्रत्येकी ५० एसटी बससह चालक असे एकूण ९७५ चालक आणि एसटी बस मुंबई, पालघर, ठाणे या विभागातर दाखल होणार आहेत. तर, औरंगाबाद विभागातून १०० चालक, सातारा विभागातून ७५ चालक आणि बीड, जळगाव या विभागातून प्रत्येकी ५० चालक असे २७५ चालक दाखल होणार आहेत.
एका बसमध्ये २२ चालकाच्या गटाने प्रवास करावा. ज्या विभागातून फक्त चालक येणार आहेत, अशा चालकांसाठी मुंबई, पालघर, ठाणे येथून बस सोडाव्यात. प्रत्येक बस निर्जंतुकीकरण केलेली असावी, असा सूचना एसटी महामंडळाने दिल्या आहेत.