CoronaVirus News: दिलासा! राज्यात ७१ हजार ७३७ रुग्णांनी कोरोनावर केली मात; आरोग्य विभागाची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:04 AM2021-04-27T01:04:10+5:302021-04-27T06:46:53+5:30

आरोग्य विभागाची माहिती  

CoronaVirus News: In the state, 71 thousand 737 patients have overcome corona | CoronaVirus News: दिलासा! राज्यात ७१ हजार ७३७ रुग्णांनी कोरोनावर केली मात; आरोग्य विभागाची माहिती  

CoronaVirus News: दिलासा! राज्यात ७१ हजार ७३७ रुग्णांनी कोरोनावर केली मात; आरोग्य विभागाची माहिती  

Next

मुंबई : मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यात दैनंदिन रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. राज्यात रविवारी ६७ हजारांहून अधिक रुग्णांचे निदान झाले होते. सोमवारी यात १९ हजारांनी घट होऊन ४८ हजार ७०० रुग्ण आढळले आहेत, तर दिवसभरातील मृत्यूंचेही प्रमाण कमी होऊन ५२४ वर आले आहे. रविवारी ही संख्या ८३२ इतकी होती. दिवसभरातील रुग्ण निदानाच्या तुलनेत सोमवारी बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सोमवारी ७१ हजार ७३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आता राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ४३ हजार ७२७ इतकी असून मृतांचा आकडा ६५ हजार २८४ आहे. सध्या ६ लाख ७४ हजार ७७० रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९२ टक्के झाले असून मृत्युदर १.५ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५९ लाख ७२ हजार १८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ७८ हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३० हजार ३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिवसभरातील ५२४ मृत्यूंपैकी २९३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ११६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ११५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ५२४ मृत्यूंमध्ये मुंबई ७१, ठाणे ८, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ८, रायगड २०, पनवेल मनपा २२, नाशिक ८, नाशिक मनपा ९, अहमदनगर २३, अहमदनगर मनपा १८, पुणे ११, पुणे मनपा २, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ७, सोलापूर मनपा १, सातारा १९, कोल्हापूर १, , सिंधुदुर्ग १३, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ५७, जालना १८, परभणी ३, परभणी मनपा ३, लातूर १७, लातूर मनपा ४, उस्मानाबाद १८, बीड २२, नांदेड २१, नांदेड मनपा ४, अकोला १, अकोला मनपा ४, अमरावती ८, अमरावती मनपा ६, यवतमाळ २१, वाशिम ५, नागपूर ४, नागपूर मनपा ३४, वर्धा १, भंडारा १, गोंदिया ५, चंद्रपूर २, गडचिरोली १० इ. रुग्णांचा समावेश आहे.
 

Web Title: CoronaVirus News: In the state, 71 thousand 737 patients have overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.