Join us

CoronaVirus News: देशांतर्गत विमानसेवेवर अद्याप प्रश्नचिन्ह; अनेक राज्यांच्या अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 2:38 AM

केंद्राच्या भूमिकेस फाटा

मुंबई : देशांतर्गत प्रवासी विमानसेवा २५ मेपासून सुरू करण्यात येईल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली असली तरी महाराष्ट्रात मात्र ही सेवा सुरू न करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यांनीही वेगवेगळे आक्षेप नोंदवल्यामुळे देशांतर्गत विमानसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले, की राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 

सर्वच राज्यांना भीती

विमानसेवा सुरू केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भीती जवळपास सर्वच राज्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विमानाने येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन बंधनकारक असेल, असे कर्नाटक, जम्मू व काश्मीर, छत्तीसगड, सिक्कीम, पंजाब आदी राज्यांनी स्पष्ट केले आहे.हे क्वारंटाईन ७ ते १४ दिवस असू शकेल. गुजरातही तसाच निर्णय घेण्याच्या विचारात आहे. आम्हाला विचारात व विश्वासात न घेता केंद्राने विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी राज्यांची तक्रार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमानभारत