CoronaVirus News : लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता फडणवीसांवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 02:01 PM2020-05-24T14:01:42+5:302020-05-24T14:45:57+5:30
CoronaVirus News : पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही; असं म्हणत पॅकेजवरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबईः पॅकेज का नाही दिलं, असा प्रश्न काही जण विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत केली, पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली. पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही; असं म्हणत पॅकेजवरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सव्वा ते दीड लाख रुग्ण महाराष्ट्रात असतील, असा अंदाज त्या केंद्रीय पथकानं व्यक्त केला होता. ३३ हजार ७८६ पॉझिटिव्ह रुग्ण हे सध्या महाराष्ट्रात आहेत. सव्वा लाख रुग्णांचा अंदाज असताना राज्यात ३३ हजार रुग्ण आहेत. दुर्दैवानं महाराष्ट्रात आजपर्यंत १५७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी परतल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. ४७ हजार १९० रुग्णांपैकी ३३ हजार फक्त पॉझिटिव्ह आहेत. राज्यात साडेतीन लाखाच्या आसपास टेस्ट झालेल्या आहेत. याच्या पुढची लढाई आणखी बिकट होणार आहे. हा गुणाकार जीवघेणा होणार आहे. पण घाबरण्याचं कारण नाही. आपण आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करत आहोत.
Monsoon season is approaching, hence, related ailments will be there too. So, we need to take extra precautions: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/etKEvUPxRc
— ANI (@ANI) May 24, 2020
कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे, पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे, सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं आहे, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय केली आहे, राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा आहे, पण इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी रक्तदात्यांना केलं आहे.
पावसात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या, सर्दी, खोकला दिसल्यात तातडीनं डॉक्टरकडे जाण्याची गरज असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोनाची लक्षण असली तरी वास न येणे, थकवा जाणवणे, वास येत नसल्यास लागलीच डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळेत रुग्णांवर उपचार सुरू केल्यामुळे ते ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला.
The fight against COVID19 is going to be tougher now but there is no need to panic as we are prepared with extra health facilities: Maharashtra CM Uddhav Thackeray as positive cases cross 47,000 in the state
— ANI (@ANI) May 24, 2020
The number of active patients is 33,786 and over 13,000 have recovered. pic.twitter.com/siCrEZcPjn
होळी झाली आणि त्यानंतर कोरोनाची बोंबाबोंब सुरू झाली. अनेक सण आपण घरच्या घरी साजरे केले आहेत. ईद साजरी करताना रस्त्यावर न येता घरातूनच प्रार्थना करा. कोरोनाचं संकट नष्ट होऊ दे, अशीसुद्धा तुम्ही दुवा मागा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिम बांधवांना केलं आहे. मार्च, एप्रिलपासून हे संकट आपल्या अवतीभोवती सुरू झालं. कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली आहे. हा विषाणू गुणाकार करतो, त्याच्या गुणाकाराला कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही शिस्त पाळल्यानं रुग्णांची संख्या आटोक्यात आली. सरकारची सुरुवात झाली अन् कोरोनाचं संकट समोर आल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा
भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार
Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल
Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश
दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ
मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला
लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं