मुंबई : मुंबईतील सर्वात पहिले हॉटस्पॉट असलेले वरळी, प्रभादेवी, लोअर परळ हा परिसर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. येथे पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी जी-दक्षिण विभाग कार्यालयाच्या सहा इमारतींमध्ये फूट आॅपरेटेड लिफ्ट, वॉटर डिस्पेन्सर आणि वॉश बेसिन सुविधा वापरण्यात येत आहेत. या वस्तूंना हात लावण्याची गरज नसल्याने कोरोनाचा प्रसार होणार नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंंग पाळण्यासाठी अॅक्रेलिक शिल्ड बसवण्यात आल्या आहेत.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर वरळी विभाग हा पहिला हॉटस्पॉट ठरला होता. येथील दाटीवाटीच्या वस्तीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. मात्र बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तीला शोधणे, प्रभावी क्वारंटाइन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे वाटप अशा काही उपाययोजनांमुळे जी दक्षिण विभागात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे.परंतु, त्यानंतरही येथील मोहीम थांबलेली नाही. या विभागात निर्जंतुकीकरण आणि सोशल डिस्टन्सिंंगवर भर दिला जात आहे.वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या विभागात आठवड्याची रुग्णवाढ आता १.३ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५ दिवसांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे कोरोनावर मिळवलेले नियंत्रण कायम राहण्यासाठी आणखी खबरदारी घेतली जात आहे.>कोरोना नियंत्रणासाठी खबरदारीवरळीमध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया, पोदार रुग्णालयात कोरोना रुग्ण आणि संशयितांसाठी जम्बो फॅसिलिटी केंद्र उभारण्यात आले.बाधित रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाºया गोळ्या, योगा, लाफिंग थेरपीचा वापर केला जातो.विभाग कार्यालयात कामाच्या फाइल्स, कर्मचाऱ्यांच्या वस्तूंचे अत्याधुनिक पद्धतीने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
CoronaVirus News : जी दक्षिण विभागात आधुनिक यंत्रणा करणार कोरोनापासून बचाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 1:30 AM