मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मुंबईतील पहिला हॉटस्पॉट ठरलेला वरळी कोळीवाडा आता या विषाणूच्या विळख्यातून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. येथील बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ९० टक्के बाधित क्षेत्रावरील निर्बंध आता हटविण्यात आली आहेत. जी दक्षिण विभागात रुग्ण संख्यावाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.९ टक्के असून रुग्ण संख्या ७६ दिवसांनी दुप्पट होत आहे.
मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. मात्र वरळी कोळीवाड्यात या विषाणूचा झपाट्याने प्रसार झाला. येथील दाटी वाटीच्या वस्तीत संसर्ग टाळणे महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरले होते. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वरळी कोळीवाड्यातील सर्व रस्ते बंद करण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन, संशयित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण, तत्काळ तपासणी व निदान आणि रुग्णांवर उपचारांसाठी कोविड केअर सेंटर्स व तात्पुरती रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली.
वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या भागांमध्ये आतापर्यंत ४५३० रुग्ण सापडले आहेत. यापैकी तीन हजार ३९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७८४ सक्रिय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कवळी कोळीवाड्यात १३ सक्रिय रुग्ण आहेत आणि १७ ठिकाणे प्रतिबंधित आहेत. वरळी, प्रभादेवी, लोअर परळध्ये आतापर्यंत ४५३० रुग्ण सापडले आहेत. यापैकी तीन हजार ३९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.