Join us

Coronavirus : मुंबईत नाईट कर्फ्यू आवश्यक; पाहा लॉकडाऊन बद्दल काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 4:17 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसंच मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देदोन आठवड्यात झपाट्यानं वाढलं रुग्णगेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मुंबईतही आता कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आता रात्रीची संचारबंदी लागू करणं आवश्यक असल्याचं मत मुंबईच्या महापौरकिशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं. "रात्रीची संचारबंदी लागू करणं आता आवश्यक झालं आहे असं मला वाटतं. तसंच आम्ही गर्दी होत असलेले बाजार दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरीत करण्यावरही विचार करत आहोत," असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्यांनी एएनआयशी बोलताना यावर भाष्य केलं. मुंबईकरांना आता लॉकडाऊनपासून वाचण्यासाठी एकत्र मिळून काम करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दोन आठवड्यात झपाट्यानं वाढलं रुग्णलॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर दादर येथील बाजारपेठेत पुन्हा गर्दी होऊ लागली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांत दादरमध्ये रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत, सध्या या परिसरात २०२ सक्रिय रुग्ण आहेत. तर बुधवारी २० बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दादर बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात महापौर दालनात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. गर्दी टाळा, नियम पाळागर्दी आणि कोरोना खबरदारीचे नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोना रुग्णवाढीला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, वारंवार हात धुवावे आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही महापौरांनी केले. लग्नसोहळे, कार्यक्रम, अंत्यविधी-दशक्रिया विधीसाठी गर्दी करू नये, नियम काटेकोरपणे पाळावेत असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईकिशोरी पेडणेकरमहापौर