Coronavirus : ना लष्कर बोलावणार, ना जीवनावश्यक वस्तूंची दुकानं बंद करणार; मुंबई पोलिसांकडून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:43 PM2020-05-07T19:43:16+5:302020-05-07T19:47:14+5:30
Coronavirus : या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत असे काहीही होणार नसल्याचा खुलासा केला आहे.
मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु आहे. दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. मात्र, काही दिवसांपासून मुंबईत लॉकडाऊन कठोर होणार, जीवनावश्यक वस्तूही मिळणं बंद होणार, मुंबईत लष्कर बोलावणार अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत असे काहीही होणार नसल्याचा खुलासा केला आहे.
मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे की, आम्हाला माहित आहे की आता तुमच्याकडे बराच मोकळा वेळ आहे. परंतु याचा उपयोग अफवा पसरविण्यापेक्षा चांगल्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच केला जाऊ शकतो. आपल्याला जीवनावश्यक गोष्टी मिळणं बंद होणार नाही तसेच लष्कर किंवा निमलष्करी दलालाही बोलावले जाणार नाही. फक्त शांत रहा आणि घरी रहा. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला फक्त एवढेच करण्याची गरज आहे.
We know there is a lot of free time. But it can definitely be utilised to do things better than spreading #rumours ! Neither do you need to hoard essentials nor is the army or paramilitary being called out. Just stay calm & stay home. That’s all we need to do to combat #corona .
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 7, 2020
तुझ्यासाठी कायपण! परदेशी गर्लफ्रेंडशी लग्न करण्यासाठी प्रियकराने लपूनछपून गाठले शिमला अन्...
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये तलवारीने चौघांवर प्राणघातक हल्ला
तुरुंगात जाण्याच्या भीतीने पोलिसाने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
अशा प्रकारे अफवांना लगाम देण्यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ट्विटच्या माध्यमातून अनेक उधाण सुटलेल्या चर्चांबाबत खुलासा केला आहे.