मुंबई : विमान प्रवासादरम्यान कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी विमानातील मधले आसन रिक्त ठेवण्याची आवश्यता नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने यासंदर्भात एअर इंडियाच्या एका वैमानिकाची याचिका फेटाळली. मात्र, नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने विमान कंपन्यांना दिले.नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या २३ मेच्या परिपत्रकानुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विमानातील तीन आसनांपैकी मधले रिक्त ठेवावे. मात्र, ‘वंदे भारत’ मिशनअंतर्गत परदेशातील भारतीयांना देशात परत आणताना या नियमाचे उल्लंघन करण्यात आले, असे एअर इंडियाचे वैमानिक देवेन कयानी यांनी दाखल जनहित याचिकेत म्हटले होते. न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद नाकाला. मधली सीट वापरताना प्रवाशांची सुरक्षा, आरोग्याची काळजी घेण्यात आली, असे आम्हाला प्रथमदर्शनी वाटते, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
CoronaVirus News: ‘विमानातील मधले आसन रिक्त ठेवण्याची आवश्यकता नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 4:37 AM