coronavirus : कुणीही घाणेरडे राजकारण करू नये; मुख्यमंत्र्यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:23 AM2020-04-27T04:23:25+5:302020-04-27T04:23:46+5:30

कोणीही घाणेरडे राजकारण करू नये, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.

coronavirus : No one should do dirty politics; The Chief Minister said | coronavirus : कुणीही घाणेरडे राजकारण करू नये; मुख्यमंत्र्यांनी सुनावले

coronavirus : कुणीही घाणेरडे राजकारण करू नये; मुख्यमंत्र्यांनी सुनावले

Next

मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढाईत राजकारण न करता सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. एकीकडे गडकरी यांचे कौतुक करतानाच राज्य आणि केंद्रातील भाजपवर मात्र त्यांनी चांगलाच निशाणा साधला. सत्ता येईल, जाईल परंतु गेलेला जीव परत येत नाही. त्यामुळे कोणीही घाणेरडे राजकारण करू नये, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपायोजनांची माहिती देतानाच त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. मी राजकारण बाजूला ठेऊन या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न करतो आहे. या काळातही राजकारण केले तर आपल्याला दुसऱ्या कोणत्या शत्रुची गरज भासणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आज एकोपा आहे. हा एकोपा असला तरी काहीजण राजकारणातच गुंतले आहेत. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांना करू देत. तो त्यांचा विषय आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला. यावेळी गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांनी हिंदीतून कौतुक केले. मी मुद्दाम हिंदीत बोललो. कारण थोडे वरपर्यंत कळेल की मी गडकरी यांची तारीफ केली. मी सगळे मोकळेपणाने बोलतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
।‘दाल में काला बाद में, पहिले दाल तो दो!’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आंतरविभागीय पथक राज्यात पाहणीसाठी आले आहेत. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत काय चालू आहे, चाचण्या कमी केल्या की काही लपवाछपवी केली का, असे बोलले जात आहे. केंद्राचे पथक आलेले आहे.
दाल मैं कुछ काला हो सकता है, असा इशारा काही जणांनी दिला. पण, आम्ही केंद्राकडूनच डाळ मागतोय. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वाटायचे आहे. फक्त तांदूळ आले आहे. गहू आणि डाळही हवी आहे. पहले दाल तो आने दो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.
>मुंबई - पुण्यातील वर्दळ परवडणारी नाही
मुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही. विषाणू घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: coronavirus : No one should do dirty politics; The Chief Minister said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.