Coronavirus: न भूतो! विकेंड असूनही लोक घरातच थांबले; एक्स्प्रेस वेवर शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:40 PM2020-03-14T14:40:26+5:302020-03-14T14:43:25+5:30

शनिवार, रविवारी मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी ये-जा असते.

Coronavirus: no traffic on mumbai pune Express highway; Peoples in fear hrb | Coronavirus: न भूतो! विकेंड असूनही लोक घरातच थांबले; एक्स्प्रेस वेवर शुकशुकाट

Coronavirus: न भूतो! विकेंड असूनही लोक घरातच थांबले; एक्स्प्रेस वेवर शुकशुकाट

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्रात सापडलेला पहिला कोरोनाचा रुग्ण मुंबईहून पुण्याला गेला होता. या दोन्ही शहरात यानंतर कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने आणि राज्यभरात 20 रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने सिनेमागृहे, उद्याने, शाळा आदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज विकेंड असूनही एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची वर्दळ फार कमी होती. 


मुंबईमध्ये दादरसह काही ठिकाणी चित्रपट गृहे सुरू होती. ठाण्यात तर शिवसैनिकांनीच मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. 


शनिवार, रविवारी मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी ये-जा असते. मात्र, आज सकाळपासूनच या मार्गावर वाहनांची संख्या कमालीची घसरलेली पहायला मिळाली. टोल नाक्यावरही रांगा लागलेल्या दिसल्या नाहीत. कोरोनाची धास्तीपेक्षा लोकांनी कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी खबरदारी घेतली. 


राज्यभरात आज एकही रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे आढळलेले नाही. मात्र, 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर अनेकांचे नमुने प्रयोगशाळेला पाठिवण्यात आले असून त्यांचे अहवाल यायचे आहेत. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रेल्वे, बसेस सुरूच राहणार आहेत. 

Web Title: Coronavirus: no traffic on mumbai pune Express highway; Peoples in fear hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.