Coronavirus :१५ आणि १६ मे रोजी मुंबईत लसीकरण नाही; मुंबई पालिकेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:24 PM2021-05-14T20:24:31+5:302021-05-14T20:25:56+5:30
Coronavirus Vaccination : पुढील माहिती लवकरच कळवण्यात येणार असल्याची पालिकेची माहिती. मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे १८ वर्षांवरील नागरिकांचंही लसीकरण १ मे पासून सुरू करण्यात आलं आहे. परंतु सध्या लसींची टंचाई पाहता १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, १५ आणि १६ मे रोजी मुंबईत लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
"मुंबईकरांनी, आम्ही सूचित करू इच्छितो की १५ आणि १६ मे २०२१ रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल," असं ट्वीट मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.
मुंबईकरांनो,
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 14, 2021
आम्ही सूचित करू इच्छितो की १५ व १६ मे, २०२१ रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे.
लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.#MyBMCVaccinationUpdate#WeShallOvercome#MyBMCUpdates
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 14, 2021
14th May, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1,657
Discharged Pts. (24 hrs) - 2,572
Total Recovered Pts. - 6,31,982
Overall Recovery Rate - 92%
Total Active Pts. - 37,656
Doubling Rate - 199 Days
Growth Rate (7 May - 13 May) - 0.34%#NaToCorona
मुंबईत कोरोनाचा आलेख खाली
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १,६५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर २,५७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या ३७,६५६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता १९९ दिवसांवर गेला आहे.