Join us

coronavirus :उत्तर मुंबई भाजयुमो जपत आहे सामाजिक बांधिलकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:52 AM

मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या सहकार्याने उत्तर मुंबई भाजयुमोचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सतत कार्यशील राहून विविध स्तरातील नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवत असल्याची माहिती उत्तर मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष अमर शाह यांनी ‘लोकमत’ला दिली.

मुंबई : उत्तर मुंबई भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सामाजिक बांधिलकी जपत मुंबई पोलीस, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर तसेच विविध स्तरातील गरजू नागरिकांना लॉकडाउनमध्येही सतत कार्यरत ठेवत अनेक उपक्रम राबवत आहे.उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहित भारतीय, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर, आमदार योगेश सागर, आमदार भाई गिरकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या सहकार्याने उत्तर मुंबई भाजयुमोचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सतत कार्यशील राहून विविध स्तरातील नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवत असल्याची माहिती उत्तर मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष अमर शाह यांनी ‘लोकमत’ला दिली.या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने बोरिवली (पूर्व) दौलतनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या ५0 तृतीय पंथीयांना शिधावाटप किटचे वितरण, १000 ज्येष्ठ नागरिकांना १0 दिवस पुरेल इतके शिधावाटप किटचे वितरण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या सहकार्याने ५000 गरजू नागरिकांना सकाळ व संध्याकाळी जेवणवाटप, बोरीवलीतून केईएम हॉस्पिटलला गरजू रुग्णांना जाण्यासाठी वाहनव्यवस्था, उत्तर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांना फेस शिल्ड, हँडसॅनिटायझर, फेसमास्क, ग्लोव्हज आदी वस्तूंचे वितरण, विभागातील डॉक्टरांसाठी पीपीई किटचे वितरण, रस्त्याच्या कडेला असलेल्या नागरिकांना मुखवटा, सॅनिटायझर यांचे वाटप करून कोरोनापासूून बचाव करण्यासाठी त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून दिले. असे अनेक उपक्रम उत्तर मुंबई भाजयुमो राबवत असल्याची माहिती अमर शाह यांनी शेवटी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसभाजपा