Join us

CoronaVirus News: कोरोना मृतांच्या आकडेवारीत कोणतीही लपवाछपवी नाही; पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 3:16 AM

विभाग स्तरावरही माहिती संकलित करणार

मुंबई : कोरोना मृतांच्या आकड्यात घोटाळा असल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेने दोन दिवसांपूर्वी ८६२ ने मृतांचा आकडा वाढविला. मात्र या प्रकरणात कोणताही घोळ झाल्याच्या आरोपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी खंडन केले. पालिकेने स्वत: पाठपुरावा करून रुग्णालयांना ४८ तासांची ताकीद देत ही आकडेवारी जनतेसमोर आणली. यापुढे विभाग स्तरावरही माहिती संकलित करण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्तांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ३२४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र यात ८६२ मृतांची नोंद मंगळवारी केली. मृतांच्या आकडेवारीत घोटाळा झाल्याने अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भाजपने केली होती. मात्र माहिती देण्याची जबाबदारी असलेले सार्वजनिक व खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स, इतर कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. अनेक जण त्या काळात बाधित झाल्याने, अपुºया कर्मचाऱ्यांमुळे नोंदी होऊ शकल्या नाहीत. ते लपविण्याचा हेतू नव्हता, असे आयुक्त म्हणाले.^‘त्या’ रुग्णालयांवर कारवाई शेवटची संधी देऊनही कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती पालिकेला न कळवल्यास अशा रुग्णालयांवर 'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.अशी उघड झाली माहिती८ जून रोजी एका खासगी रुग्णालयातून १७ मृतांचा आकडा सादर झाला. पालिकेने चौकशी केल्यानंतर त्या दिवशी केवळ एक मृत्यू झालेला असून इतर १६ मृत्यू हे पूर्वी जाहीर केले नसल्याचे समोर आले.त्यामुळे पालिका आयुक्तांनी सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना ४८ तासांच्या आत अशा पूर्वीच्या मृत्यूंची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे (एपिड सेल) सादर करण्याचे सक्त आदेश दिले.या चौकशीतून समोर आलेल्या ८६२ मृत्यूंची माहिती पालिकेने १२ ते १५ जून दरम्यान राज्य शासनाकडे सादर केली, असे आयुक्तांनी सांगितले.रुग्णालय, सहायक आयुक्तांना ताकीदमाहिती लपविण्याबद्दलीच साशंकता काहींनी व्यक्त करण्याआधीच पालिकेने मृतांची माहिती गोळा करून, त्याची खातरजमा व त्यामधील चुका दुरुस्त करून व माहितीचे समायोजन करून ती शासनाला सादर केली होती.यात जनतेसमोर ही सर्व सत्य स्थिती पारदर्शक व स्वयंस्फूर्तीने आणण्याचा पालिकेचा प्रयत्न होता, असा अप्रत्यक्ष टोला आयुक्तांनी भाजपला लगावला आहे. तसेच खासगी रुग्णालयांना कोरोना मृतांची आकडेवारी ४८ तासांत देण्याची व ही माहिती एकत्रित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या