coronavirus: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आठ लाखांच्या उंबरठ्यावर, दिवसभरात १८४ मृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 06:45 AM2020-09-01T06:45:06+5:302020-09-01T06:46:08+5:30
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के झाले असून मृत्युदर ३.१ टक्के आहे. दिवसभरात ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण कोविडमुक्त झाले.
मुंबई : राज्यात सोमवारी ११ हजार ८५२ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून १८४ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९२ हजार ५४१ झाली आहे. तर आतापर्यंत एकूण २४ हजार ५८३ जणांनी जीव गमावला आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के झाले असून मृत्युदर ३.१ टक्के आहे. दिवसभरात ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण कोविडमुक्त झाले. मात्र सोमवारी जितके रुग्ण बरे होऊन घरी गेले, तितक्याच नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे दिसून आले. सध्या १ लाख ९४ हजार ५६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या १८४ मृत्यूंमध्ये मुंबई ३२, ठाणे १०, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ९, कल्याण-डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा ३, पालघर २, वसई-विरार मनपा १, पनवेल मनपा १, नाशिक १, नाशिक मनपा २, अहमदनगर २, अहमदनगर मनपा १, धुळे २, धुळे मनपा १, जळगाव १०, जळगाव मनपा १, पुणे २ ,पुणे मनपा ७, सोलापूर ३, सोलापूर मनपा १, सातारा ७, कोल्हापूर १५, कोल्हापूर मनपा ४, सांगली ५, सांगली-मिरज- कुपवाड मनपा १, रत्नागिरी १, औरंगाबाद २, औरंगाबाद मनपा २, जालना २, लातूर ३, लातूर मनपा १, उस्मानाबाद ६, बीड ३, नांदेड ४, नांदेड मनपा ४, यवतमाळ ३, बुलढाणा १, वाशिम १, नागपूर २, नागपूर मनपा १२, गोंदिया १, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.
मागील काही दिवसांत पुणे व ठाण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, पुण्यात ५२ हजार ७१२ आणि ठाण्यात २१ हजार ३७५ सक्रिय रुग्णांवर, नाशिक व नागपूरमध्ये अनुक्रमे ११ हजार ६१४, ११ हजार ७०१ सक्रिय रुग्णांची नोंद आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३५ हजार ७२२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
मुंबईत २०,५५१ सक्रिय रुग्ण
मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार १७९ रुग्ण आढळले असून, ३२ मृत्यूंची नोंद झाली. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४५ हजार ८०५ झाली असून, बळींचा आकडा ७ हजार ६५८ झाला आहे. आतापर्यंत मुंबईतील १ लाख १७ हजार २६८ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २० हजार ५५१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८० टक्क्यांवर आला असून, रुग्ण दुपटीचा काळ ८४ दिवसांवर आला आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्ट्यांमध्ये सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या ५६७ झाली असून, ६ हजार १७१ सीलबंद इमारती आहेत.
राज्यात २४ तासांत ३४१ पोलिसांना कोरोना
मुंबई : राज्यभरात गेल्या २४ तासांत तब्बल ३४१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून, एका पोलिसाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे जीव गमावलेल्या पोलिसांचा आकडा १५६वर पोहोचला आहे.
राज्यभरात सोमवारपर्यंत १५ हजार २९४ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून, यात १ हजार ६३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १ हजार २४७ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण १२ हजार ३०६ पोलिसांनी कोरोनावर मात केली. यातील अनेक जण पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
सद्यस्थितीत ३७७ अधिकारी आणि २ हजार ४५५ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १५६ पोलिसांमध्ये १५ अधिकाºयांचा समावेश आहे.