coronavirus : चिंताजनक! ३० एप्रिलपर्यंत मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जाणार ४२ हजारावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 07:22 PM2020-04-22T19:22:51+5:302020-04-22T20:17:51+5:30

ज्या गतीने मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन खाजगी संस्थांकडून महाराष्ट्रात काय परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेतला आहे.

coronavirus: The number of corona positive patient in Mumbai will go up to 42,000 till April 30 | coronavirus : चिंताजनक! ३० एप्रिलपर्यंत मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जाणार ४२ हजारावर

coronavirus : चिंताजनक! ३० एप्रिलपर्यंत मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जाणार ४२ हजारावर

Next
ठळक मुद्दे३० एप्रिलपर्यंत मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जाणार ४२ हजारावर१५ मे पर्यंत हा आकडा जाईल ६,५६,४०७ वर जाईल..!मुंबईची पाहणी करण्यासाठी आलेल्या पहाणी पाच सदस्यीय केंद्रीय पथकाचा धक्कादायक अंदाज

मुंबईमुंबईत कोरोनाचा मुकाबला राज्य सरकार कसे करत आहे याची पहाणी करण्यासाठी आलेल्या पाच सदस्यीय टीमने स्वत:सोबत काही अंदाज दर्शवणारी आकडेवारी आणली होती, त्यानुसार ३० एप्रिल पर्यंत एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ४२,६०४ होणार आहे तर हीच संख्या १५ मे पर्यंत ६,५६,४०७ पर्यंत जाईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी वारंवार संपर्क साधला पण त्यांनी काहीही सांगितले नाही. दरम्यान, रात्री उशिरा मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले की, असा कोणताही अहवाल केंद्रीय पथकाने मुंबई महानगरपालिकेला दिलेला नाही. त्यामुळे त्याविषयी अधिक काहीच बोलू शकत नाही. केंद्राच्या टीमने धारावीत बोलताना परिस्थिती गंभीर आहे, यापेक्षा जास्त आम्ही काही बोलू शकत नाही असे उत्तर दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ज्या गतीने मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन खाजगी संस्थांकडून महाराष्ट्रात काय परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेतला आहे. हा अंदाज गणिती पध्दतीने काढण्यात आला आहे. १६ एप्रिल रोजी जी आकडेवारी अधिकृत उपलब्ध होती त्याचा आधार घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय रुग्ण संख्या ३.८ दिवसांनी डबल होत आहे, अंदाजे एकत्रित वाढ २० टक्के आणि उपलब्ध साधनसामुग्री यांचा आधार यासाठी घेण्यात आला आहे.

या कथित अहवालामुळे राज्यात व मुंबईकरांमध्ये पॅनिक परिस्थिती निर्माण होत असताना दिवसभरात राज्य सरकारने, सार्वजनिक आरोग्य विभागाने अथवा मुंबई महापालिकेने याविषयीचा कोणताही खुलासा न केल्यामुळे त्यांची या अहवालास मूक संमती आहे असे बोलले जात आहे. त्यातून मुंबईच्या अस्वस्थतेत भरच पडली आहे.

या अंदाजानुसार ३० एप्रिल पर्यंत विना आॅक्सीजनचे ३०,४८१ आयसोलेशन बेड कमी पडतील. जर वेळीच यावर उपाय केले गेले नाहीत १५ मे रोजी असे ४,८३,३८५ आयसोलेशन बेड कमी पडतील असे अंदाजात म्हटले आहे. आॅक्सीजन सह असणारे आयस्हाोलेशन बेड ३० एप्रिल पर्यंत ५,४६६ तर १५ मे पर्यंत ८४,९३२ आयसोलेशन बेड बेड कमी पडतील. आयसीयू बेड देखील कमी पडणार आहेत. ३० एप्रिलपर्यंत १२०० तर १५ मे पर्यंत २७,६८८ आयसीयू बेड कमी पडणार आहेत. आपल्याकडे व्हेंटीलेटर भरपूर आहेत असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे करत असले तरी ३० एप्रिल रोजी ३९२ तर १५ मे रोजी १३६३ व्हेंटीलेटर कमी पडतील असे ही हा अहवाल म्हणत आहे.

केंद्राची टीम येणार म्हणून पोलिस यंत्रणा रस्त्यावर तत्पर झाल्याचे चित्र दिसत होते. शिवाय बाधा झालेले पण लक्षण न दिसणाऱ्यांची तपासणी मुंबई महापालिकेने बंद करुन टाकली आहे. त्यामुळे देखील कोरोनाची साथ वाढण्यास मदत होईल असे काही जाणकारांचे मत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Web Title: coronavirus: The number of corona positive patient in Mumbai will go up to 42,000 till April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.