Join us

CoronaVirus : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांवर; आज सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:00 PM

Coronavirus : मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांपैकी १ हजार ३४४ रुग्ण, सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना व सर्वेक्षण अंतर्गत संशयित रुग्णांचा शोध लागला आहे.

मुंबई : राज्यासह मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. यात सोमवारी १८७ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने ही रुग्णसंख्या ३ हजार ३२ वर पोहोचली आहे. तर सोमवारी सात मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा १३९ झाला आहे.

१४ ते १७ एप्रिल दरम्यान विविध प्रयोगळांमध्ये झालेल्या १३७ कोरोना चाचणी अहवाल सोमवारी प्राप्त झाल्यामुळे या रुग्णांचा अहवालात त्यांचा अतंर्भाव केला आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले असून या १३८ क्लिनिक्समध्ये ५ हजार ४२८ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी , २ हजार ३९ संशयितांचे नमुने घेण्यात आले.

मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांपैकी १ हजार ३४४ रुग्ण, सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना व सर्वेक्षण अंतर्गत संशयित रुग्णांचा शोध लागला आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातील ४३ हजार ५९१ इमारतींच्या आवारात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

पालिकेच्या विविध रुग्णालयांत सोमवारी ३६३ कोरोना संशयित रुग्ण भरती झाले, तर आजपर्यंत ६ हजार ६६७७६ रुग्ण भरती झाले आहेत. तर सोमवारी ८४ जण कोरोनामुक्त झाले आजमितीस मुंबईतील ३९४ रुग्ण बरे झाले आहेत.

नानावटी रुग्णालयात आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाविलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात रुग्णालयातील १ डॉक्टर, दोन परिचारिका, १ मार्केटिंग एक्झिकेटीव्ह, १ सुरक्षा रक्षक, १ किचन बॉय, १ एसी मेंटेनन्स स्टाफ, १ लॉड्रीवाला अशा एकूण कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांची कसून शोध मोहिम घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे केली आहे. या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर पालिकेने येथील प्रत्येक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली असून जोपर्यंत कोरोनाचा टेस्टचा रिपोर्ट येत नाही तो पर्यंत आम्ही येथील कर्मचाऱ्यांना घरी  क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले असल्याची माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस