Coronavirus: चिंताजनक! बाधित रुग्णांची संख्या काही विभागात वाढली; दररोज १२०० रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:58 AM2020-07-03T01:58:02+5:302020-07-03T01:58:16+5:30
पश्चिम उपनगरात दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव येथे ३५८५ आढळून आले.
मुंबई : कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. त्याच वेळी भांडुप, मुलुंड, मालाड, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, कांदिवली, दहिसर, ग्रँट रोड, माहीम काही या भागांमध्ये गेल्या काही दिवसांत बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पश्चिम उपनगर मालाड ते दहिसर, मुलुंड, भांडुप येथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मिशन झिरो सुरू करण्यात आले आहे. मात्र काही विभागांमध्ये रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
मुंबई दररोज सरासरी १२०० ते १३०० रूग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी तब्बल १५०० बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दैनंदिन वाढ १.६८ वरून १.७३ टक्के झाली आहे. गेल्या आठवड्यात विशेषत: भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग या विभागात सर्वाधिक ८२९ रुग्णांची नोंद झाली आहे. मलबार हिल, ग्रँट रोड, पेडर रोडमध्येही बाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे. तसेच मुलुंड विभागात दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण मुंबईतील सरासरीहून दुप्पट आहे. काही उच्चभ्रू वसाहतींमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यापैकी उच्चभ्रू वस्ती असलेल्या मलबार हिल, ग्रँड रोड, पेडर रोड नेपियन्सी रोड या डी विभाग कार्यालयाच्या अखत्यारीतील परिसरात पथके नेमून पालिकेने कसून तपासणी सुरू केली आहे.
रुग्णांचा आलेख वाढतोय
गेल्या आठवड्यात भांडुपमध्ये ८२९ रुग्ण, मालाडमध्ये ६७५ रुग्ण, अंधेरी पूर्व ६२१, मुलुंड ५९२, बोरिवली ५२१, घाटकोपर ४४२, अंधेरी पश्चिम ४२३, कांदिवली ४१६, परळ ४०८, दादर-माहीम ३८८ रुग्ण आढळून आले आहेत. तर पूर्व उपनगरात मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द आणि गोवंडी या विभागात २५९ रुग्ण आढळून आले.
पश्चिम उपनगरात दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव येथे ३५८५ आढळून आले. तर दक्षिण मध्य भागात परळ, वरळी, दादर-माटुंगा, धारावी येथे १२७७ आणि दक्षिण मुंबईत कुलाबा, चर्चगेट, चर्नीरोड, काळबादेवी, मलबार हिल, नागपाडा, भायखळा, माझगाव येथे ८१७ नवीन रुग्ण आढळून आले.
दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव येथे ३५८५ आढळून आले. परळ, वरळी, दादर-माटुंगा, धारावी येथे १२७७, कुलाबा, चर्चगेट, चर्नी रोड, काळबादेवी, मलबार हिल, नागपाडा, भायखळा, माझगाव येथे ८१७ नवीन रुग्ण आढळले.