मुंबई : धारावी परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी रुग्णांचा आकडा २८ वर पोहचला तर तीन जणांचे मृत्यू झाले आहेत. यातील ११ रुग्णांपैकी दोघं मरकज येथून आले होते. मात्र या दोघांना खबरदारी म्हणून यापूर्वीच राजीव गांधी क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरावर कोरोना संकट ओढावले आहे. येथील डॉ. बालिगा नगरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे या परिसरातील अडीच हजार लोकवस्ती बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. मात्र गेल्या आठवड्याभरात संपूर्ण धारावीतील झोपडपट्टयांत रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत दहा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
गुरुवारी मुकुंद नगर चाळ येथील आरोग्य शिबिरात पाच रुग्ण सापडले तर शुक्रवारी आणखी सहा रुग्ण आढळले. दोन दिवसांत चाचणीत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या ११ पैकी दोघे मरकजवरून आलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या यादी त्यांची नावे असल्याने त्या दोघांना यापूर्वीच राजीव गांधी क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोरोनाग्रस्त रुग्ण...च्डॉ. बालिगा नगर - पाच रुग्ण (एकाचा मृत्यू, चार लोकांवर उपचार सुरू)च्वैभव इमारत, धारावी मुख्य रस्ता...(३५ वर्षीय वैद्यकीय कर्मचारी व त्याच्या पत्नीला लागण)च्मकुंद नगर झोपडपट्टी - नऊच्मदिना नगर (२१ वर्षीय तरुण)च्धन वडा चाळ (३५ वर्षीय तरुण)च्मुस्लिम नगर (५० वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरुष)च्सोशल नगर (६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू)च्जनता सोसायटी (५९ वर्षांचा व्यक्ती व त्याची ४९ वर्षांची पत्नी)च्कल्याण वाडी (७० वर्षीय महिलेचा मृत्यू, ३१ वर्षीय महिला रुग्ण)च्पीएमजीपी कॉलनी एक पुरुषच्मुर्गुन चाळ ५१ वर्षीय पुरुषच्राजीव गांधी चाळ २६ वर्षीय तरुणच्वरळी जिजामाता नगर येथे ४३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.च्तसेच सुश्रुषा येथे डायलिसिस करणाऱ्या ५९ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.दादरमध्ये आणखी तीन जणांना कोरोनामुंबई : दादर परिसरात कोरोनाची लागण झालेले तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोन महिला सुश्रुषा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी असल्याने या रुग्णालयातील अन्य २८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णालयातच क्वाारंंटाईन करून चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे.दादर पश्चिम येथे गेल्या आठवड्याात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. यापैकी दोन ज्येष्ठ नागरिक होते, तसेच तिन्ही रुग्णांनी नजीकच्या काळात मुंबईबाहेर प्रवास केल्याचा इतिहास नव्हता. दरम्यान, शुक्रवारी दादर परिसरात आणखी तीन लोकांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी दोन रुग्ण सुश्रुषा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी आहेत तर एन. सी. केळकर मार्गावरील ८३ वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे.या रुग्णालयातील अन्य २८ वैद्यकीय कर्मचाºयांना रुग्णालयातच चाचणी करून घेण्यास पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने सांगितले आहे. चाचणी अहवाल आल्यानंतर पालिका पुढची कार्यवाही करणार आहे. तोपर्यंत या रुग्णालयात कोणत्याही नवीन रुग्णांची भरती केली जाऊ नये, तसेच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना ४८ तासांमध्ये डिस्चार्ज द्यावा, असे आदेश पालिकेने दिले आहेत.च्याआधी शिवाजी पार्क येथील ज्येष्ठ नागरिक, पोर्तुगिज चर्चशेजारील इमारतीत राहणाºया महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर चितळे पथ येथील इमारतीत राहणाºया ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे समोर आले.च्पोर्तुगिज चर्च येथील महिलेच्या संपर्कातील पाच नातलगांना हाय रिस्क ठरवून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.च्माहीम परिसरातील दोन लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यापैकी ४३ वर्षीय बाधित व्यक्तीचे एमएमसी मार्गावर मटणाचे दुकान आहे. तर ब्रीच केंडी रुग्णालयातील एका वैद्यकीय कर्मचाºयालाही कोरोनाची लागण झाली आहे.