Coronavirus: मुंबई महापालिकेच्या प्लांटमधून होणार दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 07:35 AM2021-11-29T07:35:03+5:302021-11-29T07:35:29+5:30

Coronavirus: दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी नवा जंबो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

Coronavirus: One and a half thousand oxygen cylinders will be supplied daily from Mumbai Municipal Corporation's plant | Coronavirus: मुंबई महापालिकेच्या प्लांटमधून होणार दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा

Coronavirus: मुंबई महापालिकेच्या प्लांटमधून होणार दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा

Next

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी नवा जंबो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. भारत पेट्रोलियम आणि मुंबई महापालिकेच्यावतीने लवकरच माहुल परिसरात सुरू होणाऱ्या या ऑक्सिजन प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मिशन ऑक्सिजनची घोषणा करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने या जंबो ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीला तीन महिन्यांपूर्वी सुरुवात केली असून लवकरच हा प्लांट सुरू केला जाणार आहे. प्लांटमधून मुंबईतील मोठ्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. शिवाय आरसीएफ कंपनीने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू केला आहे. दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनी माहुल येथील कामाचा आढावा घेतला. यावेळी पालिकेचे अधिकारी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

- माहुल, चेंबूर येथे पालिकेच्या जागेवर प्लांट उभारण्यात आला आहे.

- व्ही पी एस ए टेक्नॉलॉजीद्वारा ऑक्सिजन निर्मिती

- भारत पेट्रोलियमच्यावतीने एक आणि पालिकेच्यावतीने दोन ऑक्सिजन कॉम्प्रेसर यंत्रणा बसविण्यात आली आहे.

- प्रकल्पाचा खर्च अंदाजे १५ कोटी रुपये

- १४ लीटरचा एक याप्रमाणे तासाला सुमारे ५० सिलिंडर

- दिवसाला सुमारे १५०० सिलिंडरचा पुरवठा

- लोकमान्य टिळक रुग्णालय आणि इतर मोठ्या रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा

Web Title: Coronavirus: One and a half thousand oxygen cylinders will be supplied daily from Mumbai Municipal Corporation's plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.