CoronaVirus News: सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात; आशिष शेलार यांचा आरोप

By अतुल कुलकर्णी | Published: September 3, 2020 08:29 AM2020-09-03T08:29:40+5:302020-09-03T09:04:45+5:30

दिनो मोर्याच्या जवळच्या लोकांना कशी कामे मिळतात? 

CoronaVirus one family involved in sanitizer scam alleges bjp leader ashish shelar | CoronaVirus News: सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात; आशिष शेलार यांचा आरोप

CoronaVirus News: सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात; आशिष शेलार यांचा आरोप

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी

मुंबई : अभिनेता दिनो मोर्या यांचे आणि शिवसेनेच्या एका नेत्याचे संबंध जगजाहीर आहेत. मोर्याशी संबंधित लोकांनाच आरोग्यविषयक कामांचे ठेके दिले जात आहेत. दुसरीकडे मुंबईच्या महापौर स्वत:च्या मुलाला आणि जावयाला कोव्हीड सेंटर देण्यात व्यस्त आहेत, या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश अधिवेशनात भाजपच्या वतीने केला जाईल, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते माजी शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार केला आहे.

राज्यात १४२ कंपन्या सॅनिटायझर बनवत होत्या. यात पैसा आहे हे लक्षात येताच कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर ११० नवीन कंपन्यांचा जन्म झाला. त्यातील १६ कंपन्यांवर एफडीएने कारवाई करून छापे टाकले होते. त्यातल्या ८ कंपन्या बोगस निघाल्या. एफडीएला आपण पत्र लिहिल्यानंतर सुध्दा एकाही कंपनीची चौकशी केली गेली नाही. सरकारने २५२ कंपन्यांची चौकशी करायला हवी होती अशी खळबळजनक माहिती देताना मुंबई महापालिकेत सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.

एका एनजीओने सगळ्या सॅनिटायजरचे नमुने घेतले. त्यांच्या चाचणीमध्ये ४८ उत्पादने दोषी आढळली. मुंबई महापालिकेने श्वेतपत्रिका काढून ही सगळी माहिती जाहीर करावी. आम्ही या प्रकरणाची पोलिस आणि सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अधिवेशनात करणार आहोत असेही शेलार म्हणाले.

महापालिकेने मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सेवेपासून वंचित ठेवले. ४५ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या महापालिकेच्या हॉस्पीटलमध्ये अप्रमाणित सॅनिटायझर आणि डिसईन्फेक्टंट वापरली जात आहेत. यामुळेच जानेवारीमध्ये एका ट्रॉमा सेंटरमध्ये रूग्णांची दृष्टी गेली. डॉक्टरांनीच चौकशी समितीसमोर व्यथा मांडल्या. हॉस्पीटलमध्ये निर्माण होणाऱ्या संसर्गाला पूर्णपणे महापालिका जबाबदार आहे असे सांगून अ‍ॅड. शेलार म्हणाले, मुंबई महापालिका आयुक्तांना मी तीन वेळा भेटलो. आयुक्तांचे आदेश त्यांचे सहकारी ऐकत नाहीत. ठोक व्यापाऱ्यांकडूनही सॅनिटायझर विकत घेतले जात आहे. बोगस सॅनिटायझरमुळे लोकं आजारी पडत आहेत. डोळ्याची जळजळ, डोके दुखणे याची चिकित्सा आवश्यक असल्याचे सांगून शेलार म्हणाले, महापालिकेचा हलगर्जीपणा मुंबईकरांच्या नशिबी आला आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. ही मुलाखत आज (गुरुवारी) रात्री ९ वाजता लोकमत यूट्यूबवर प्रकाशित होणार आहे. 

मास्क विक्रेत्यांशी सरकारची मिलीभगत
मास्कच्या किंमतीवर नियंत्रण आणणार अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मात्र पुढे काहीही झाले नाही. मास्कचा विषय आता भाजपा ऐरणीवर आणणार आहे. केलेली लबाडी समोर आणू. सरकारची यात मिलीभगत आहे म्हणून मास्कच्या किमतीवर नियंत्रण आणले जात नाही, असा आरोपही अ‍ॅड. शेलार यांनी केला.

Web Title: CoronaVirus one family involved in sanitizer scam alleges bjp leader ashish shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.