coronavirus: वडाळा, भायखळ्यातही एक हजार रुग्ण, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:10 AM2020-05-16T04:10:30+5:302020-05-16T04:10:53+5:30
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १७ हजारांवर पोहोचला आहे. तर शुक्रवारपर्यंत एकूण ६५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील संपूर्ण २४ वॉर्डपैकी आतापर्यंत वरळी, प्रभादेवी आणि धारावी या परिसरात कोरोनाबाधित अधिक असल्याचे आढळून येत होते.
मुंबई : धारावी भागातच नव्हेतर, मुंबईतील अन्य चार विभागांमध्ये एक हजाराहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. वरळी, प्रभादेवी या जी दक्षिण विभागात यापूर्वीच रुग्णसंख्या १२०० वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ भायखळा, अंधेरी पश्चिम, वडाळा, अॅण्टॉप हिल येथे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर डोंगरी, मुलुंड, बोरीवली, दहिसर येथे रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १७ हजारांवर पोहोचला आहे. तर शुक्रवारपर्यंत एकूण ६५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील संपूर्ण २४ वॉर्डपैकी आतापर्यंत वरळी, प्रभादेवी आणि धारावी या परिसरात कोरोनाबाधित अधिक असल्याचे आढळून येत होते. मात्र पश्चिम उपनगरात अंधेरी पश्चिम, ओशिवरा तर शहरात भायखळा आणि वडाळा, माटुंगा, अॅण्टॉप हिल हे नवीन हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. येथे रुग्णसंख्या अधिक दिसत असली तरी आता दररोज सापडणाऱ्या बाधित रुग्णांचा सरासरी आकडा कमी झाल्याचे दिसून येत आहे, असे पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले.
संपूर्ण २४ विभागांमध्ये रुग्ण वाढण्याचे प्रमाण ६.७ टक्के एवढे आहे. मात्र आतापर्यंत कमी रुग्णसंख्या असलेल्या मुलुंडमध्ये रुग्ण वाढण्याचे प्रमाण १८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यापाठोपाठ दहिसर आणि बोरीवलीतील काही भागांमध्ये ११.९ टक्के तर डोंगरी, मशीद बंदर येथे ९.९ टक्के अशी वाढ दिसून येत आहे. या विभागांमध्ये आठ दिवसांच्या आत रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
अन्य विभागातील रुग्ण
कुर्ला ९४२
वांद्रा, सांताक्रुझ पूर्व ८५९
मानखुर्द, देवनार ७७१
अंधेरी पूर्व, साकी नाका ७४४
मलबार हिल, ग्रॅण्ट रोड ५६३
शिवडी, परळ ५५७
चेंबूर ५११
आतापर्यंत पालिकेने एकूण एक लाख
२७ हजार लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. यापैकी ११.६० टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे
मुंबईतील ३२१ फिव्हर क्लिनिकमध्ये १५ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. ४,५८४ लोकांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३९२ बाधित असल्याचे आढळून आले.