CoronaVirus News: मुंबईत फक्त ५२ आयसीयू खाटा, तर १७ व्हेंटिलेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 03:44 AM2020-06-20T03:44:48+5:302020-06-20T03:45:00+5:30

दररोज सरासरी १२०० बाधित रुग्णांची नोंद; जास्तीत जास्त लोकांची करणार चाचणी; कोविड काळजी केंद्र सज्ज

CoronaVirus Only 52 ICU beds 17 ventilators in Mumbai | CoronaVirus News: मुंबईत फक्त ५२ आयसीयू खाटा, तर १७ व्हेंटिलेटर

CoronaVirus News: मुंबईत फक्त ५२ आयसीयू खाटा, तर १७ व्हेंटिलेटर

Next

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी महापालिकेने रुग्णालय व कोविड काळजी केंद्रात खाटांची क्षमता वाढविली. यापैकी २५ टक्के खाटा सध्या उपलब्ध आहेत. तर अतिदक्षता विभागात फक्त ५२ खाटा आणि १७ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. पालिकेच्या शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, मुंबईत आतापर्यंत ६४ हजार ६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांत महापालिकेने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांची वाढ दुप्पट होण्याचा कालावधी आता ३३ दिवसांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ३२ हजार २५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र दररोज सरासरी १२०० बाधित रुग्णांची नोंद होत असल्याने जास्तीत जास्त लोकांची चाचणी, संशयितांना क्वारंटाइन आणि कोविड काळजी केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.  

सध्या मुंबईत २८ हजार ३८८ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी कोरोनाची लक्षणे नसलेल्या १५ हजार ७३५ रुग्णांचा समावेश आहे. तर लक्षणे असलेल्या मात्र प्रकृती स्थिर असलेले सुमारे १० हजारांहून अधिक रुग्ण पालिका रुग्णालयात व कोविड काळजी केंद्रात उपचार घेत आहेत. प्रकृती गंभीर असलेले एक हजार रुग्ण आहेत. त्यामुळे या रुग्णांसाठी उपलब्ध केलेल्या अतिदक्षता विभागातील १२०० खाटांपैकी ९० टक्क्यांहून अधिक खाटांवर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ६९९ व्हेंटिलेटर वापरात असून आता केवळ १७ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.

64,068 आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण
32,257 डिस्चार्ज
3,423 मृत्यू
28,388 सक्रिय रुग्ण
15,735 लक्षणे नसलेले
10,185 लक्षणे असलेले
1,001 गंभीर रुग्ण

एकूण रुग्ण खाटा (रुग्णालय, केंद्र)
18,294 रुग्ण
12,870 दाखल
5,424 उपलब्ध
1,215 आयसीयू खाटा
52 उपलब्ध
714 व्हेंटिलेटर
17 उपलब्ध

Web Title: CoronaVirus Only 52 ICU beds 17 ventilators in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.