Coronavirus: केवळ नियम बदलत राहिले, सरकारचा संभ्रम अद्यापही कायम; विरोधी पक्षांकडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 03:26 AM2020-07-02T03:26:35+5:302020-07-02T03:26:52+5:30

रोज बदलणाऱ्या नियमांमुळे नागरिकांचा अडचणी वाटल्याचा आरोप मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केला.

Coronavirus: Only the rules kept changing, government still confuse Criticism by opposition parties | Coronavirus: केवळ नियम बदलत राहिले, सरकारचा संभ्रम अद्यापही कायम; विरोधी पक्षांकडून टीका

Coronavirus: केवळ नियम बदलत राहिले, सरकारचा संभ्रम अद्यापही कायम; विरोधी पक्षांकडून टीका

Next

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अनलॉकच्या फेऱ्या सुरू असल्या तरी मुंबईवरचा धोका कायम आहे. सतत बदलणारे आणि रोज नव्याने निघणाºया नियमांमुळे नागरिकांचा गोंधळ उडत आहे. अधिकारी, नियम बदलले तरी कोरोनाची स्थिती मात्र जैसे थे आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. मुंबईत सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाचा अभावही कोरोना संकटाच्या काळात प्रकर्षाने जाणवत असल्याची भावना राजकीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला शंभर दिवस होत आले आहेत. सुरुवातीला केंद्र सरकारकडून राबविला जाणारा लॉकडाऊन अनलॉकचा टप्प्यावर आता स्थानिक पातळीवर ठरत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात वरळी, धारावी अशा दाट लोकवस्तीतील हॉटस्पॉट आता उपनगरात विशेषत: पश्चिम उपनगराच्या दिशेने सरकला आहे. कोरोनाच्या काळात मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाच्या मर्यादा उघड झाल्याचा आरोप भाजप आणि मनसेकडून होत आहे. विद्यापीठातील परीक्षा, परीक्षा फी, शाळांची फी आदी मुद्यावरून भाजपने सरकारवर निशाणा साधला. सर्वच आघाड्यांवर संभ्रमाची स्थिती आहे. राज्यात लॉकडाऊनबाबतच संभ्रम असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तर, पालिका स्तरावर कोरोनाशी लढा देताना पूर्ण गोंधळ आहे. फसवे आकडे सादर केले जात आहेत, असा आरोप पालिकेतील भाजप गटनेते विनोद मिश्रा यांनी केला आहे.

पालिकेने उशिराने का होईना कोरोनासाठी विविध रुग्णालये ताब्यात घेतली. पण, त्या रुग्णालयांचे वीजबिल, पाणीपट्टी, देखभाल खर्च, मालमत्ता कराबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. हे सर्व कर माफ करण्यासाठी युद्धपातळीवर धोरण निश्चित करून दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे मिश्रा म्हणाले.

रोज बदलणाऱ्या नियमांमुळे नागरिकांचा अडचणी वाटल्याचा आरोप मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. एकीकडे अनलॉक सुरू असताना दोन किलोमीटरच्या परिघाचा नियम पुढे करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहन जप्तीची कारवाई केली. लॉकडाऊन की अनलॉक, सरकारला नक्की काय अभिप्रेत आहे? कुठलाही निश्चित एक्झिट प्लान नसल्यामुळेच सरकार संभ्रमावस्थेत सापडल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. तर, कोरोनाच्या काळातही मुंबईतील भ्रष्टाचार थांबला नाही. केवळ स्वत:च्या हितचिंतकांना फायदा व्हावा म्हणून मान्यताप्राप्त, उत्तम दर्जाच्या कंपन्या नाकारल्या जात आहेत, असा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. शवांसाठीच्या पिशव्यांपासून कोविड सेंटरमधील पंख्यापर्यंत प्रत्येक व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला.

रोज बदलणाºया नियमांमुळे नागरिकांचा अडचणी वाटल्याचा आरोप मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. एकीकडे अनलॉक सुरू असताना दोन किलोमीटरच्या परिघाचा नियम पुढे करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहन जप्तीची कारवाई केली. लॉकडाऊन की अनलॉक, सरकारला नक्की काय अभिप्रेत आहे? कुठलाही निश्चित एक्झिट प्लान नसल्यामुळेच सरकार संभ्रमावस्थेत सापडल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

Web Title: Coronavirus: Only the rules kept changing, government still confuse Criticism by opposition parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.