Coronavirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७१ दिवसांवर; राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 03:02 AM2020-10-14T03:02:50+5:302020-10-14T03:02:57+5:30

राज्यात दिवसभरात कोरोनाचे ८ हजार ५२२ रुग्ण आढळले आणि १८७ मृत्यूंची नोंद झाली. बळींची संख्या ४० हजार ७०१ आहे.

Coronavirus: Patient double duration in Mumbai is 71 days; The cure rate in the state is 84% | Coronavirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७१ दिवसांवर; राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्के

Coronavirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७१ दिवसांवर; राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्के

Next

मुंबई : मुंबईत मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे २ हजार ३५४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १ लाख ९८ हजार ४१८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. परिणामी, मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्के झाला असून राज्याच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. शिवाय, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ७१ दिवसांवर गेला आहे.

मुंबईत मंगळवारी १ हजार ३२५ रुग्ण आणि ३८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर-उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३२ हजार ३९१ वर पोहोचली असून ९ हजार ५०७ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत शहर-उपनगरात अन्य कारणांमुळे ४४७ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. सध्या २४ हजार १९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्के

राज्यात दिवसभरात कोरोनाचे १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १२ लाख ९७ हजार २५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०३ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात २ लाख ५ हजार ४१५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात दिवसभरात कोरोनाचे ८ हजार ५२२ रुग्ण आढळले आणि १८७ मृत्यूंची नोंद झाली. बळींची संख्या ४० हजार ७०१ आहे. सध्या २३ लाख ३७ हजार ८९९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, २५ हजार ८५७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

Web Title: Coronavirus: Patient double duration in Mumbai is 71 days; The cure rate in the state is 84%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.