Join us

CoronaVirus News: मुंबईकरांना डबल दिलासा! कोरोनाचा धोका कमी होतोय; समोर आली 'पॉझिटिव्ह' आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 9:24 PM

कोविड वाढीचा दर ०.९३ टक्क्यांवर; रुग्ण दुपटीचा काळ ७५ दिवसांवर

मुंबई - मुंबईत दिवसभरात १ हजार २०८ रुग्ण व ५३ मृत्यू झाले आहेत. परिणामी शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या १ लाख १३ हजार १९९ असून मृतांचा आकडा ६ हजार ३०० झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ८६ हजार ४४७ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २० हजार १५८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७६ टक्के झाले आहे, तर रुग्ण दुपटीचा दर ७५ दिवसांवर पोहोचले आहे. २३ जुलै ते २९ जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.९३ टक्के आहे. शहर उपनगरात बुधवारपर्यंत कोविडच्या ५ लाख १६ हजर ७१४ चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईत गुरुवारी नोंद झालेल्या ५३ मृत्यूंमध्ये ४० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३५ रुग्ण पुरुष व १८ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय ४० वर्षांखालील होते. ३२ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे. तर उर्वरित २० रुग्णांचे वय ४० ते ६० वयोगटातील आहेत. शहर उपनगरात दिवसभरात ७३५ कोविड संशयित रुग्णांना भरती कऱण्यात आले, तर आतापर्यंत ७९ हजार ९३९ रुग्णांना दाखल कऱण्यात आले आहेत.

शहर उपनगरात ६१६ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. तर ६ हजार १७३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिका प्रशासनाने रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखीम असलेल्या ५ हजार ६०९ सहवासितांचा शोध घेतला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या