गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : नामांकित टेलिकॉम कंपनी एअरटेलकडून पोस्टपेड ग्राहकांना ‘फोनचे बिल ड्युु डेटला भरा, अन्यथा दंड आकारू’ असे मेसेज पाठविण्यात आल्याने अकफळएछने संकटकाळात माणुसकी सोडल्याची संतापजनक भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच बिल भरण्यासाठी आॅनलाइन पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला कंपनीकडून देण्यात येत असला तरी टेक्नोसॅव्ही नसलेल्या लोकांना बिल कसे भरायचे, असा प्रश्न पडून फोन बंद होण्याची भीती सतावत आहे.
मात्र याबाबत कंपनीच्या मुंबई सीईओपासून भारतातील कॉर्पोरेट हेडपर्यंत सर्वांनीच बेजबाबदारपणे हात वर केल्याने ग्राहकांची कंपनीबाबतची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. एअरटेलचे जुने ग्राहक असलेले प्रसाद के यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांना एक एसएमएस आला. ज्यात एअरटेल बिलाची रक्कम सांगत त्या ड्यु डेटवर न भरल्यास त्यांना ११८ रुपये दंड म्हणून आकारले जातील, असा उल्लेख करण्यात आला. मुळात बिल भरण्यात रेग्युलर असल्याने कंपनीकडून असा मेसेज त्याना अपेक्षित नव्हता. हाच प्रकार मालाडच्या किरण शिंंदे आणि दहिसरच्या प्रदीपसिंंग ठाकूर यांच्या बाबतीतही घडला. अद्याप कंपनीने अनेक ग्राहकांना असे मेसेज पाठविल्याची माहिती आहे.
मुळात आज लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडाला आहे. घर चालविणे हिच तारेवरची कसरत असल्याने मोबाईल बील भरायचे कसे हा प्रश्न आहेच, त्यातही कंपनीने माणुसकी सोडत दंड आकारण्याचा निर्णय घेतल्याने इतक्या वर्षांचे नाते तोडत माणुसकी सोडून कंपनी वागत असल्याची प्रीतिक्रिया ग्राहकांकडून दिली जात आहे. ग्राहकांमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या या मेसेजबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने कंपनीच्या मुंबई सीइओ ते देशाच्या कॉर्पोरेट हेडपर्यंत सर्वांना संपर्क केला. मात्र कोणाचेही कनेक्शन बंद करण्यात येणार नसल्याचा दावा कंपनीकडून केला जात असला तरी संबंधित एकानेही याबाबत अधिकृत उत्तर न देता हात वर केले.लॉकडाउन तोडण्यास प्रवृत्त केले जातेय एअरटेल कंपनीचे बिल वेगवेगळ्या आॅनलाइन अॅपवरून अनेक ग्राहक भरतात. मात्र ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांनी हे बिल कसे भरायचे. तसेच मुंबई ही रेड झोनमध्ये मोडत असून कंपनीच्या गॅलरीदेखील सध्या बंद आहेत. मात्र अशा मेसेजमुळे बिल भरण्यासाठी लोकांना लॉकडाउन तोडण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे गॅलरी शोधताना त्याला कोरोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण आहे याचे उत्तर कंपनीने द्यावे. - प्रदीपसिंंग ठाकूर, ग्राहक, एअरटेलमानसिक आरोग्यही बिघडेललॉकडाउनदरम्यान कुटुंबापासून लांब राहणाºया नागरिकांकडे फोन हेच असे साधन आहे ज्याच्या माध्यमातून ते मित्र परिवार आणि नातेवाइकांची खुशाली जाणत त्यांचे मानसिक आरोग्य स्थिर ठेवत आहेत. मात्र एअरटेलने पाठविलेल्या बिल आणि दंडाच्या मेसेजनंतर कनेक्शन बंद केले तर जीवाभावाच्या लोकांशी संपर्क कायमचा तुटून मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.- किरण शिंंदे, ग्राहक, एअरटेलमला बोलण्याचा अधिकार नाही! मला याप्रकरणी अधिकृत वक्तव्य करण्याचा अधिकार नसून तुम्ही याबाबत जनसंपर्क अधिकाºयाला संपर्क करा. - अमित त्रिपाठी, सीइओ, एअरटेल, मुंबई विभागअसे मेसेज जाणे चुकीचेच !कंपनीकडून असे मेसेज जाणे चुकीचेच आहे. ते ऑटोजनरेटेड आहेत. उद्यापासून ते बंद करण्यात येतील. याबाबत अधिकृतपणे माहिती देऊ शकत नाही. - सत्यजीत बोराह, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम भारत विभाग, एअरटेलबिल भरण्याचे अनेक मार्ग !बिलाची रक्कम भरण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ग्राहकांसोबतचे नाते आम्ही जपत असून कोणाचेही कनेक्शन आम्ही बंद करणार नाही. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणते आश्वासन देऊ शकत नाही. - आशुतोष शर्मा, हेड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, एअरटेल