CoronaVirus: ‘नायर’मध्ये प्लाझ्मा केंद्र; योग्य दात्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:34 AM2020-04-21T02:34:52+5:302020-04-21T02:37:07+5:30
ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी (प्रतिपिंडे) निर्माण झाले आहेत आणि ज्यांना डिस्चार्ज मिळाला आहे अशा व्यक्तींची दाता म्हणून निवड केली जाणार आहे.
मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र शहरात मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू असणार आहे.
प्लाझ्मा उपचारपद्धतींसाठी योग्य दात्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी (प्रतिपिंडे) निर्माण झाले आहेत आणि ज्यांना डिस्चार्ज मिळाला आहे अशा व्यक्तींची दाता म्हणून निवड केली जाणार आहे.
सध्या नायर रुग्णालयात विविध आजारांसाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आवारातील एच इमारतीमध्ये २५० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. तर या रुग्णालयात काम करणाºया व कोरोना नसलेल्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व परिचारिकांचा वेगळा चमू असणार आहे. त्यामुळे संसर्ग नियंत्रणात राखण्यास मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे, सलग ड्युटी करणाºया कर्मचाऱ्यांना ब्रेक मिळून तिथेच राहण्याची सुविधा करण्याबाबतही रुग्णालय प्रशासन विचार करत आहे. या प्झामा केंद्राची सर्व जबाबदारी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. तर नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल हे आता पालिकेच्या रुग्णालयाचे संचालक म्हणून जबाबदारी पाहणार आहेत.