coronavirus: देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाज्मा उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 05:59 AM2020-10-28T05:59:45+5:302020-10-28T06:00:19+5:30

Devendra Fadnavis News : बिहारच्या निवडणूक प्रचार दौऱ्याहून शनिवारी रात्री परतल्यानंतर फडणवीस यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

coronavirus: Plasma treatment on Devendra Fadnavis | coronavirus: देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाज्मा उपचार

coronavirus: देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाज्मा उपचार

Next

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोरोनावर उपचार घेत असून त्यांना  प्लाज्मा देण्यात आला. सेंट जॉर्ज इस्पितळात ते उपचार घेत असून त्यांना रविवारी २०० मिली तर सोमवारी सायंकाळी तेवढाच प्लाज्मा देण्यात आला.

बिहारच्या निवडणूक प्रचार दौऱ्याहून शनिवारी रात्री परतल्यानंतर फडणवीस यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची ऑक्सिजनची पातळी किंचित कमी झाल्याने त्यांना काही स्टेरॉईडस् आणि रेमडेसीवरही देण्यात आले. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, फडणवीस यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. प्लाज्माच्या परिणामकारकतेवर आयसीएमआरने साशंकता व्यक्त केली आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैैद्यकीय रुग्णालयांमध्ये प्लाज्मा देणे सुरू आहे आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले जाते. 

Web Title: coronavirus: Plasma treatment on Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.