Join us

Coronavirus: प्लाझ्मा उपचार पद्धतीने १५ जण कोविडमुक्त; अँटीबॉडीजसाठी डोनरचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:32 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले, १४ ते १५ टक्के मध्यम लक्षणे असलेले तर ४ ते ५ टक्के रुग्ण गंभीर असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : प्लाझ्मा थेरपीमुळे मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातून १५ जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्यामुळे केईएम, सायन, जे.जे. रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपीसाठी दात्यांकडून प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले, १४ ते १५ टक्के मध्यम लक्षणे असलेले तर ४ ते ५ टक्के रुग्ण गंभीर असल्याचे समोर आले आहे. पालिकेने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात दात्यांकडून मिळालेल्या अँटीबॉडीजमुळे ४ रुग्ण बरे झाले होते. आता आणखी ११ रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझ्मा थेरपीमुळे नायर रुग्णालयात आतापर्यंत १५ रुग्ण बरे झाले आहेत. पालिकेच्या सायन, केईएम, कस्तुरबा रुग्णालयासह राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे. जे. रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

पालिकेच्या सायन रुग्णालयात सहा दात्यांकडून अँटीबॉडीज मिळवण्यात आल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि महापालिकेच्या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या