Join us

coronavirus: सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 7:16 AM

coronavirus in Mumbai : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई सध्या डेंजर झोनमध्ये आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई सध्या डेंजर झोनमध्ये आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.  लोकल प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना दिलेली प्रवासाची परवानगी पुन्हा रद्द करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.  मुंबईत दररोज पाच ते सहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याने रुग्णांची संख्या काही दिवसांत दहा हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आयुक्त इकबालसिंह चहल यांनीच वर्तविली आहे. मुंबईत सध्या रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

खाटांची संख्या वाढविणार... सध्या ३,९०० खाटा उपलब्ध आहेत. ३२४ आयसीयू तर १७० व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने १६ हजार खाटांची संख्या वाढवून २५ हजार खाटा उपलब्ध  करुन दिले जाणार आहेत. पालिकेची खाटा वाढवण्याची तयारी सुरु आहे.  असे असतील निर्बंध    धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वृद्ध, लहान मुले मोठ्या संख्येने जातात. त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद केली जातील. हॉटेलमध्ये ५०% उपस्थिती, चित्रपटगृह, मॉल बंद केले जातील.  सामान्य प्रवाशांना लोकलमधील प्रवास बंद करुन अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जाईल, खाजगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीवर भर, दुकाने एक दिवस सोडून उघडली जातील, असे महापौरांनी सांगितले.  मागणी काय? संपूर्ण लॉकडाऊन केला तर गोरगरीब व मजुरांचे हाल होतील. म्हणून सरसकट लॉकडाऊन लागू करू नका.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई उपनगरी रेल्वे