Join us

CoronaVirus मुंबईत दाट वस्तीतील संक्रमण रोखण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 6:47 AM

रुग्णसंख्या ७१४ वर : दिवसभरात १०६ नव्या रूग्णांची भर, ११ हजार नागरिकांसाठी अलगीकरण सुविधा

मुंबई : मुंबइच्या दाट वस्त्यांतील कोरोनाचा फैलाव रोखम्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून ११ हजार नागरिकांसाठी विविध ठिकाणी अलगीकरण सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. शहर आणि उपनगरात बुधवारी दिवसभरात १०६ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७१४ वर पोहोचली. पालिकेच्या आरÞोग्य विभागाच्या माहितीनुसार, मृतांची संख्या ४५ झाली आहे.

मुंबईच्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाने केलेला शिरकाव आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने घातक असून तो रोखण्यासाठी शहर -उपनगरातील जवळपास ३०० परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात समूह संक्रमण रोखण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्यासाठी जागोजागी फिव्हर क्लिनिक सुरु करुन त्या माध्यमातून शोध, तपासणी व उपचार प्रक्रियेत रुग्णांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात २४ विभागात ११,००० नागरिकांच्या अलगीकरणासाठी सुविधा तयार करÞण्यात आल्या आहेत. या संस्थांमध्ये दाटवस्तीमध्ये राहणारे कोविड-१९ रुग्णांचे संपर्कातील अतिजोखमीचे व कमीजोखमीचे सहवासित यांना अलग केल्याने दाट वस्तीतील समूह संक्रमण रोखता येणार आहे. आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त सहवासितांना या अलगीकरण केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे. अशा अतिजोखमीच्या सहवासितांचे सर्वेक्षण करुन त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस