Coronavirus : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ‘सर्वांसाठी पाणी’ उपलब्ध करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 03:06 AM2020-03-18T03:06:13+5:302020-03-18T03:06:52+5:30

मुंबईसह जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. सरकार अनेक उपाययोजना, आरोग्यसेवांमधून नागरिकांना धीर देत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे.

Coronavirus : Provide 'water for all' to stop the spread of the corona | Coronavirus : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ‘सर्वांसाठी पाणी’ उपलब्ध करा

Coronavirus : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ‘सर्वांसाठी पाणी’ उपलब्ध करा

Next

मुंबई : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ‘सर्वांसाठी पाणी’ उपलब्ध करून देण्याकरिता पाण्यापासून वंचित सर्व श्रमिक वसाहतींमध्ये तात्पुरत्या सार्वजनिक नळांची आणि शौचालयांची व्यवस्था करावी, अशी मागणी पाणी हक्क समितीने केली आहे. कारण ज्यांना स्वातंत्र्यानंतरही पाणी मिळूच दिले नाही, अशा नागरिकांनी कोरोनापासून संरक्षणाकरिता कुठून पाणी मिळवावे, असा सवाल समितीने केला आहे.

मुंबईसह जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. सरकार अनेक उपाययोजना, आरोग्यसेवांमधून नागरिकांना धीर देत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने कोरोनावर उपाययोजना म्हणून पाण्याने वारंवार स्वच्छ हात धुण्याचे आवाहन खबरदारी उपाय म्हणून केले आहे. मात्र, ज्यांना पाणी मिळत नाही, त्यांनी काय करावे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न कोण सोडविणार? याबाबत लवकर उपाय करावेत, असे म्हणणे समितीचे आहे. मानवतावादी भूमिकेतून परिस्थिती समजून घेऊन सरकारने जागे होऊन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता पाण्यापासून वंचित सर्व श्रमिक वसाहतींमध्ये तात्पुरत्या सार्वजनिक नळांची आणि शौचालयांची व्यवस्था करावी. शहराच्या आणि देशाच्या आरोग्यासाठी शासन-प्रशासन आणि नागरिक एक होऊन या परिस्थितीशी लढू या. देशास कोरोनामुक्त करू या, असे आवाहन पाणी हक्क समितीतर्फे करण्यात येत आहे.

जमिनीवरील वस्त्या, फूटपाथवर निवास करणारे व बेघर, खासगी जमिनीवरील अघोषित वस्त्या, यामधील सुमारे १५ लाख नागरिकांना पाणी नाकारण्यात आले आहे.
५ लाख नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
मुंबईत श्रमिक नागरिकांची १२ टक्के लोकसंख्या आहे.

शहराचे सेवेकरी किंवा श्रमिक मुंबई महापालिकेने पाणी देण्यासाठी नाकारलेल्या वस्त्यांमध्ये राहत आहेत. याच श्रमिकाला; सेवेकरालाच बाधा होऊ नये, म्हणून स्वच्छ आणि आरोग्यदायी जगण्यासाठी पाण्यासकट सर्व सुविधा पुरविणे गरजेचे आहे.
- सीताराम शेलार,
निमंत्रक, पाणी हक्क समिती

Web Title: Coronavirus : Provide 'water for all' to stop the spread of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.