Join us

coronavirus: मास्क न घालणाऱ्यांना झाडू मारण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 3:12 AM

Mumbai news : आता मास्क घातला नाही तर याद राखा, झाडूने चक्क रस्ता स्वच्छ करावा लागणार आहे. मुंबईतील अशा प्रकारे के पश्चिम वॉर्डमध्ये राबविण्यात येत असलेली ही पहिली अभिनव संकल्पना आहे.

- मनोहर कुंभेजकर मुंबई : आता मास्क घातला नाही तर याद राखा, झाडूने चक्क रस्ता स्वच्छ करावा लागणार आहे. मुंबईतील अशा प्रकारे के पश्चिम वॉर्डमध्ये राबविण्यात येत असलेली ही पहिली अभिनव संकल्पना आहे. ही अभिनव संकल्पना पश्चिम उपनगरचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची असून के पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी गेल्या सात दिवसांपासून ही येथे राबवली आहे.पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची ही अभिनव संकल्पना के पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशन परिसर, जेव्हीपीडी या ठिकाणी गेल्या सात दिवसांपासून राबवण्यास सुरुवात केली आहे. रोज मास्क घालत नसलेल्या नागरिकांनी २०० रुपये दंड भरला नाही तर, आम्ही चक्क त्यांच्या हातात झाडू देतो, आणि आमच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना एक तास रस्ता स्वच्छ करायला लावतो. रोज किमान दंड भरू शकत नसलेले विनामास्क ५ ते ६ नागरिक आम्हाला आढळून येतात आणि त्यांच्याकडून रस्ता आम्ही स्वच्छ करून घेतो, अशी माहिती मोटे यांनी ‘लोकमत’ला दिली. जेव्हीपीडी रोडवर कपासवाडीजवळ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी ३ जणांना विनामास्कबाबत दंड आकारण्यात आला आहे. सदर वेळी दंडाची रक्कम जमा करू शकले नाहीत अशा लोकांना जवळपास एक तास रस्ता सफाईसाठी झाडू मारून घेऊन समज देऊन सोडून दिले, अशी माहिती मोटे यांनी दिली.विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन खात्याचे २५ कनिष्ठ पर्यवेक्षक व दंडात्मक करवाई करणारे ३० मार्शल सहभागी आहेत, अशी माहिती के पश्चिम वॉर्डचे घनकचरा व्यवस्थापनाचे सहायक अभियंता धीरज बांगर यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई