CoronaVirus: क्वारंटाइन क्षमतेत होणार वाढ; रुग्णालयातील खाटा वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:01 AM2020-04-25T06:01:17+5:302020-04-25T07:02:17+5:30
रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेची धावपळ
मुंबई : कोरोनाची लागण झालेले सरासरी अडीशे ते तीनशे रुग्ण दररोज सापडत आहेत. परिणामी, महिन्याभरात मुंबईतील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशी स्थिती उद्भवल्यास त्यासाठी सज्ज राहण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार रिकाम्या इमारतींबरोबरच शाळा, महाविद्यालय, लॉज आदी सार्वजनिक जागा ताब्यात घेऊन क्वारंटाइन सेंटरमध्ये त्याचे रूपांतर करण्यात येत आहे. तसेच शासकीय रुग्णालयात काही खाटा अशा एकूण तीन हजार खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्याचे चांगले परिणाम काही विभागांमध्ये दिसून येत आहे. मात्र पुढील महिन्याभरात रुग्णाचा आकडा वाढत ७० हजारपर्यंत पोहचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रातून आलेल्या उच्चस्तरीय पथकाने मुंबईतील हॉट स्पॉट विभागांची पाहणी करून रुग्णांच्या चाचणीचे प्रमाण आणि क्वारंटाइन सुविधा वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील राज्य शासनाचे सेंट जॉर्ज रूग्णालय आणि जी.टी. रुग्णालयात किमान सहाशे खाटांची व्यवस्था करण्यात येईल. या रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनही उपलब्ध करण्यात आले आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या अत्यावस्थ रुग्णांसाठी तीन हजार खाटा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे.
धारावी, वरळी, भायखळा, कुर्ला अशा विभागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक असल्याने येथील लॉज, पालिका शाळा, सभागृहांमध्ये व्यवस्था करण्यात येत असल्याचे, पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या पालिकेची प्रमुख रूग्णालय, १६ उपनगरीय रुग्णालय, विशेष रूग्णालय तसेच पालिका शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, सभागृह, लॉज, रिकाम्या इमारतींमधील जागा ताब्यात घेऊन कोरोना संशयित व बाधित रुग्णांसाठी २३ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र वरळी, धारावी, कुर्ला, भायखळा या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने तिथे कोरोनाचा संसर्ग रोखणे पालिकेसाठी आव्हान ठरत आहे.
नायर रुग्णालयात सध्या २२० खाटा आहेत. यातील तसेच अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमताही लवकरच वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कस्तुरबा रुग्णालयात १२५ खाटा आणि जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात १४० खाटा कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी राखीव आहेत.
मंत्रालयातील अधिकारीही मदतीला
पालिकेच्या मदतीला मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांची फौज पाठविण्यात आली आहे. अश्विनी भिडे आणि एन. रामस्वामी या दोन अधिकाºयांना यापूर्वीच प्रतिनियुक्तीवर पालिकेत पाठविले आहे. त्यांनतर आता प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक सचिव प्राजक्ता लवंगारे यांना तात्पुरत्या नियुक्तीवर पाठविले आहे.
पालिकेच्या मदतीला मंत्रालयातील सनदी अधिकाºयांची फौज पाठविण्यात आली आहे. अश्विनी भिडे आणि एन. रामस्वामी या दोन अधिकाºयांना यापूर्वीच प्रतिनियुक्तीवर पालिकेत पाठविले आहे. त्यांनतर आता प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक सचिव प्राजक्ता लवंगारे यांना तात्पुरत्या नियुक्तीवर पाठविले आहे.