coronavirus: गृहनिर्माण सोसायटीतच उभारले क्वारंटाइन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 01:47 AM2020-07-09T01:47:59+5:302020-07-09T01:48:10+5:30

दिंडोशी स्थित म्हाडा वसाहत क्रं. २-३ मधील 'श्री समर्थ फेडरेशन’ने सोसायटी कार्यालयांचे 'विलगीकरण कक्षा' मध्ये रूपांतर करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे.

coronavirus: Quarantine center set up in housing society | coronavirus: गृहनिर्माण सोसायटीतच उभारले क्वारंटाइन सेंटर

coronavirus: गृहनिर्माण सोसायटीतच उभारले क्वारंटाइन सेंटर

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई : बऱ्याच ठिकाणी सोसायटीच्या मनमानी कारभाराची उदाहरणे समोर येत असताना गोरेगाव पूर्व नागरी निवारा १ व २ जवळील दिंडोशी स्थित म्हाडा वसाहत क्रं. २-३ मधील 'श्री समर्थ फेडरेशन’ने सोसायटी कार्यालयांचे 'विलगीकरण कक्षा' मध्ये रूपांतर करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे.
कोरोनाच्या भयावह काळात सगळीकडेच सोयीसुविधांचा अभाव असताना 'श्री समर्थ फेडरेशन' ने सुरु केलेल्या या अभिनव उपक्रमाची सर्वच स्तरातून प्रशंसा होत आहे.
सध्या या सोसायटीत आजपर्यंत १६ कोरोना रुग्ण असून यातील काही रुग्ण येथील विलगीकरण कक्षाचा लाभ घेत आहेत. या गृहनिर्माण सोसायटीत १० इमारतीत ३१० सदस्य राहतात. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना आपल्या सोसायटीत १० इमारतीत गरजू कोरोनाबाधित सदस्यांना चांगले उपचार व त्यांना आराम व घरचे सकस अन्न मिळून त्यांना लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी न्यू दिंडोशी म्हाडा येथील इमारत क्रमांक २ व ३ येथील श्री समर्थ फेडरेशनने सोसायटीच्या कार्यालयाचे क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतर केले.

Web Title: coronavirus: Quarantine center set up in housing society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.